एकेकाळी एकमेकांचे सोबती असणारे आता कट्टर विरोधक बनले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. पुन्हा राज्यात भाजप – सेना युतीच सरकार आणलं. तेव्हापासून उद्धव ठाकरेंना जबर धक्के बसत आहेत. आमदारांपाठोपाठ, खासदार, नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडली.
अजूनही मोठ्या प्रमाणात राज्यातून एकनाथ शिंदे गटाला समर्थन मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमोरील आव्हान काही केल्या थांबण्याची नावं घेत नाहीये. अशातच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर येतं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास ठेवत करमाळ्याची उमेदवारी दिली त्या रश्मी बागल यादेखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याच बोललं जातं आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला असल्याचं देखील म्हंटलं जातं आहे.
नुकतीच रश्मी बागल यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी भेट घेतली. या भेटीमुळे अधिकच चर्चाना वेग आला आहे. रश्मी बागल या २०१९ विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. २०१९ विधानसभा निवडणुकीत करमाळ्यात रश्मी बागल आणि नारायण पाटील यांच्यात लढत झाली.
दरम्यान, माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. मात्र २०१९ विधानसभा निवडणुकीत करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे आमदार म्हणून निवडून आले. तर आता सत्तांतर झाल्यापासून नारायण पाटील, रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या