Election : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना या निवडणुकींमध्ये अनेक आश्चर्यकारक निकाल आता लागत आहेत. १६ तारखेला झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर आज अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहे. त्यातून सरकारमध्ये असणाऱ्या शिंदे गटाला धूळ चारण्यात विरोधक यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी शिंदे गटाचे मंत्री, बडे नेते यांना स्थानिक पातळीवर पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला मुख्यमंत्रीही अपवाद नाहीत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला पाहायला मिळतोय. ठाण्यातील अनेक ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले. या ठिकाणी शिंदे गटाला २४ ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपला ३० जागा मिळाल्या आहेत.
अधिक माहितीनुसार, आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये ठाण्यात सर्वाधिक जागा ठाकरे गटाला मिळाल्याचे समजते. महाविकास आघाडी आणि ठाकरे गट मिळून एकूण ५० जागा त्यांना मिळाल्या आहेत. परंतु याच ठिकाणी २८ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच अजून कोणत्या पक्षासोबत जाणार, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
या २८ ग्रामपंचायती जर शिंदे गट आणि भाजपसोबत गेल्या. तर ठाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदे सरकारचा वरचष्मा राहील. मात्र या २८ ग्रामपंचायतींनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर येत्या काळात ठाण्यामध्ये ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचेच वर्चस्व असेल.
पहिल्यांदा रायगड या ठिकाणी शिंदे गटातील भरत गोगावले यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर रत्नागिरीमध्ये देखील उदय सामंत यांच्या पॅनलचे उमेदवार पराभूत झाले. रत्नागिरीमध्ये अनेक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे उमेदवार जिंकून आले. त्यानंतर आता ठाण्यामध्ये सुद्धा तेच चित्र पाहायला मिळत आहे.
अशाप्रकारे राज्यामध्ये सरकार जरी शिंदे गटाचे असले तरी स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून शर्तीचे प्रयत्न होताना दिसतायेत. दुसरीकडे शिंदे गटाचे उमेदवार पराभूत होत असताना महाविकास आघाडी आपली पाळीमुळे घट्ट करत ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारताना दिसत आहे. आता सर्व ग्रामपंचायतींचे निकाल लागल्यानंतर पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या-
Rahul Gandhi : इंदिरा गांधींचे उपकार फेडण्यासाठी आजींनी केलं असं काही की, राहुल गांधीही झाले भावूक
Shakti Kapoor : सुनील दत्तकडे १५०० रूपयांवर काम करायचे शक्ती कपूर, पण मर्सिडीज ठोकली अन् नशीब पालटले
PHOTO: शाहरूखच्या मुलाने त्याचे नाव केले रोशन, ‘या’ खेळामध्ये जिंकले सुवर्णपदक