Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा ‘तो’ निर्णय अन् शिवसेना हातातून निसटली; पृथ्वीराज चव्हाणांनी आधीच दिला होता इशारा

Uddhav Thackeray

uddhav thackeray wrong desicion  | एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात पक्षातील चिन्हावरुन सध्या वाद सुरु आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला असून दोन्ही पक्ष आपपल्या पद्धतीने युक्तीवाद करताना दिसून येत आहे. या युक्तीवादांमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामाही चर्चेचा विषय ठरला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला राजीनामाच त्यांची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा यामुळे दिला कारण त्यांच्याकडे बहुमतच नव्हते, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग हे करताना दिसून आले आहे.

ठाकरेंनी राजीनामा दिला तिथे अनेक प्रश्न निकाली निघालेले आहे, असा दावाही मनिंदर सिंग यांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात याआधीही एक सुनावणी झाली होती. तिथेही शिंदे गटाच्या वकीलाने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केला होता.

उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नव्हता पाहिजे. त्यांनी राजीनामा देऊन चुक केली आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते.

तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळीच या राजीनाम्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात अडचणीचा ठरु शकतो असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. आता तसेच झाले असून ठाकरेंच्या राजीनाम्याचा विषय शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात लावून ठेवला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आता मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घेईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. कारण ठाकरे गटाने याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगाकडे जाऊ नये अशी मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने ती मागणी फेटाळली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो” – एकनाथ शिंदे
shinde group : थापाच नाही तर बाळासाहेबांच्या जवळची आणखी एक व्यक्तीने उद्धव ठाकरेंची साथ सोडली; 35 वर्षांचं नातं तोडलं
Govinda: राजा बाबूसमोर श्रीवल्ली झाली फेल! गोविंदाने सामी सामी गाण्यावर केला जबरी डान्स, पहा व्हिडीओ

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now