uddhav thackeray three symbol for shivsena | शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरु आहे. एकनाथ शिंदे आपण खरी शिवसेना असल्याचे सांगत आहे. आपल्याकडे आमदार, खासदार, नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपणच खरी शिवसेना आहोत असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.
त्यामुळे याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार होते. आता निवडणूक आयोगाने एक धक्का देणारा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे. तसेच शिवसेना नाव वापरण्यावरही बंदी घातली आहे. पण हा निर्णय अंधेरी पोटनिवडणूकीपुरताच असणार आहे.
दोन्ही गटांसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे दोन्ही गटांना दुसरे चिन्ह घ्यावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्याकडे चिन्हासाठी तीन पर्याय आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय उद्धव ठाकरे गटाने निवडले आहे.
या तिन्ही चिन्हांपैकी कोणतेही चिन्ह ठाकरे गट घेऊ शकते. शिंदे गटाबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अंधेरीच्या निवडणूकीत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट कोणते चिन्ह वापरतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशात शिंदे गटाला आमदार रवी राणा यांनी एक ऑफर दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आदरणीय शिंदेसाहेब आपणास गरज पडल्यास आपण माझ्या पक्षाचे असलेले पाना चिन्ह घेऊन उभे राहू शकतात. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावे.
त्यामुळे आता एकनाथ शिंदे चिन्हाबाबत कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत निवडणूक आयोगाने शनिवारी निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे.तम्या
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : ‘या’ बड्या नेत्याची एकनाथ शिंदेंना थेट ऑफर; म्हणाले, आमचं चिन्ह आणि नाव दोन्ही वापरा
Uddhav Thackeray : आयोगाने चिन्ह गोठवताच उद्धव ठाकरे झाले आक्रमक, शिवसैनिकांना दिला खास संदेश; म्हणाले…
Alka Kubal : अलका कुबल यांच्या पायलट लेकीने पुन्हा घेतली उंच भरारी; मुलीला शुभेच्छा देत अलका म्हणाल्या…