Share

Uddhav Thackeray : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एक महिला बसवायची आहे; उद्धव ठाकरेंनी सांगितली खास रणनीती

Uddhav Thackeray

uddhav thackeray talking about women cm | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेते शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे.

आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे. एक महिला मुख्यमंत्रिपदी असो किंवा पुरुष मुख्यमंत्रिपदी असो पण सत्ता आणायची आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहे. उद्धव ठाकरे कोणत्या महिला नेत्याबद्दल बोलत होते. ती महिला शिवसेनेतील असे का इतर कोणत्या पक्षातील? असाही प्रश्न सर्वांना पडला आहे.

लहूजी वस्ताद यांची २२८ वी जयंती बुधवारी होती. या जयंतीनिमित्त मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. बोलत असताना त्यांनी भाजप-शिंदे सरकारवरही जोरदार टीका केली आहे.

आता आपल्याला मशाल निशाणी मिळाली आहे. आपण महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. शिवशक्ती, भिमशक्ती आणि लहूशक्ती एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करु शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

तसेच मी अनुभवतो आहे की गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आम्ही सुद्धा मंत्री होतो. पण आम्ही कधीही थापा मारल्या नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

अण्णाभाऊ यांनी मुंबई मिळवून दिली. आता आपण काय करतोय? आता असं चित्र निर्माण झालं आहे. हा समाज दुर्लक्षित राहायला लागला आहे हे सत्य आहे. अण्णाभाऊ साठेंनी मुंबई मिळवून दिली. पण मुंबईत त्यांचं एक स्मारक नाही. त्यांना भारतरत्न अजून दिला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांना ‘जाणता राजा’ पदवी दिली जाते, ते कुठे लढायला गेले होते? नरेंद्र पाटलांचा सवाल
virat kohli : वर्ल्डकपमध्ये विराटने मला मारलेल्या ‘त्या’ षटकारांमुळे मी खुष आहे कारण…; पाकीस्तानच्या रौफचे हैराण करणारे वक्तव्य
russia : मुस्लीम तरुण कृष्णभक्तीला करत होता विरोध, तर संतापली रशियन तरुणी; थेट हिंदू तरुणाशी थाटला संसार

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now