uddhav thackeray : ‘आपला दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार..,’ असं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं आहे. यामुळे आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण तापलं आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे.
नुकतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानवर भाषण केलं. आज मुंबईत शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतच शिंदे गटावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाची दमदार सुरुवात आज एवढी गर्दी, दसऱ्याला किती असेल…आपला दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार! असं म्हणतं ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. ‘दसरा मेळावा शिवर्तीर्थवरच होणार,’ असा ठामपणे निर्धार उद्धव ठाकरेंनी भर सभेत केला.
पुढे उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे की, ‘दिल्लीत जाता मग पंतप्रधानांना ठणकावून विचारून दाखवा, वेंदाता महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राला सवलत का देण्यात आली नाही? दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ अशी मिंधे गटाची अवस्था असल्याचं म्हणत ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
‘व्हर्च्युअल क्लास ही संकल्पना सेनेने आणली. पितृपक्ष म्हणजे आमचा पक्ष. निवडणुका जिंकण्यासाठी आधी मुंबईकरांची मनं जिंका, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. तुमचं सरकार येण्याआधी वारीला परवानगी कोणी दिली होती? आम्ही जे करतो त्याची जाहिरात नाही करत. भाजपनं माणसं धुवायची लॉन्ड्री काढली आहे का?, असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
दरम्यान, ‘भ्रष्टाचार आम्ही संपवणार म्हणणाऱ्यांनी आरशात तोंड पाहावं. लोकशाही जिवंत आहे का? हे कोर्टाचा निकाल ठरवेल. वाटा खोके आणि करा सरकार कशाला हव्या आहेत निवडणुका. सेनेसारखी मदत कधी भाजपने केली का?,’ असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
‘२५ वर्ष युतीत सडली, मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, रक्त सांडलं तरी चालेल, असं देखील उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. मिंधे गट नुसता शेपट्या घालूनआज दिल्लीत गेलेत, दिल्लीत मुजरा, महाराष्ट्रात गोंधळ.दिल्लीत जाऊन हिंमत असेल तर पंतप्रधानांना सांगा की आमचा प्रकल्प परत द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!