Share

uddhav thackeray : आमच्या अंगावर आल्यास कोथळा बाहेर काढू, गद्दारांची लक्तरं काढणार; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

udhav

uddhav thackeray : सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. नुकतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानवर भाषण केलं. आज शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान बोलताना ठाकरेंनी भाजपला लक्ष केलं.

वाचा उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हंटलंय?
‘मुलं पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद आहे राज्यात. व्यासपिठावर आल्यावर पाहिलं वडिल आहेत का आमचे? अमित शहांना माहिती नाही जमिनीवर गवताची पाती नाहीत तलवारीची पाती आहेत. गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका,’ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपल्या स्वराज्यावर अनेक शाह चालून आले होते. अमित शहा मुंबईत येऊन बोलून गेले शिवसेनेला जमीन दाखवणार पण आम्ही भाजपला आस्मान दाखवूनच राहणार. मुंबई संकटात असताना ही गिधाडं कुठं असतात. आमच्या अंगावर आल्यास राजकारणात कोथळा बाहेर काढू,’ असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.

भाजपला लक्ष्य करताना उद्धव ठाकरेंनी म्हंटलंय की, ‘आईला गिळायला काही जण निघाले आहेत. ज्या शिवसेनेनं सर्व काही दिलं त्यांनाच गिळायला निघाले. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा अन् ही शिवसेना बाळासाहेबांची. गद्दारांची लक्तरं या दसऱ्याला काढणार.’

तसेच ‘कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय? आमच्या वंशवादावर टीका केली जाते पण मला घराण्याचा अभिमान. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात माझ्या आजोबांचं योगदान. पुन्हा सांगतो २५ वर्षे आमची युतीत सडली. भाजपचं कर्तृत्व काय? आमचा आधार घेऊन वरती पोहोचला. मेहनत शिवसैनिकांची अन् डोक्यावर राष्ट्रीय पक्ष बसला,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ‘धारावीत आर्थिक केंद्र झालं पाहिजे जे गुजरातनं पळवलं. वेदांताबद्दल धांदात खोट बोलताय. वेदांतासाठी आम्ही तुमच्यासोबत येतो. शिवसेना म्हणजे मुंबईकरांचा विश्वास. दिल्लीत जाता मग पंतप्रधानांना ठणकावून विचारून दाखवा, वेंदाता महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राला सवलत का देण्यात आली नाही?,’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी 
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now