Share

Uddhav Thackeray : बीडमध्ये खळबळ! एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणे भोवले, शिवसेनेतून ‘या’ बड्या नेत्याची हकालपट्टी

uddhav thackeray eknath shinde

uddhav thackeray remove leader jaydutt ksheersagar |  सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहे. एक गट म्हणजे ठाकरे गट आणि दुसरा गट म्हणजे शिंदे गट. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सामील झालेले आहेत. इतक्या मोठ्या बंडामुळे शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचा ठाकरे गट गद्दार म्हणून उल्लेख करत आहे.

असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणे शिवसेनेच्या माजी मंत्र्याला चांगलंच महागात पडलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधल्यामुळे शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून क्षीरसागर यांची हकालपट्टी झाली आहे. बीडचे जिल्हा संपर्क प्रमुख धोंडीराम पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. या हकालपट्टीमुळे बीडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील सिमेंट रस्ता आणि नाला यांचे ७० कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला होता. जयदत्त क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन याबाबत धोंडीराम पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे काम करताना त्यांनी कधीही उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले नाही. कुठल्याही कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकला नाही. नुकत्याच झालेल्या उद्घाटनातही त्यांनी ठाकरेंचा उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांचा आता शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही, असे धोंडीराम पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महाभियानाच्या अंतर्गत हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले होते. तसेच पक्ष त्यांच्यावर नाराज होता, त्यामुळे आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
BMC : मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत मनसे-भाजप एकत्र येणार? फडणवीसांच्या जवळच्या नेत्याचा मोठा खुलासा
Nayantara : आई होऊन काही दिवसच झाले की नयनतारावर आलं मोठं संकट, कोसळला दुखाचा डोंगर
UPSC मध्ये नापास झाल्यानंतर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला दिली इतकी वाईट सजा, स्वत: त्यानेच सांगितली व्यथा

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now