शुक्रवारी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना धक्का देणारा निर्णय दिला आहे. त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाने ७८ पानांचा निकाल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे असताना काही असे मुद्दे आहेत ज्यावरुन ठाकरेंना शिवसेना परत मिळू शकते असे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने दिलेला निकाल मान्य नसल्यामुळे आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर शिंदेंकडूनही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणावरुन शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांसमोर येणार आहे. ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाच्या विरोधात महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे. ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काही प्रश्न उपस्थित केले आहे.
प्रश्न-
१. निवडणूक आयोगाने कायदेशीर चौकट ओलांडत चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेतला का?
२. शिवसेनेमध्ये गटबाजी सुरु आहे हे निवडणूक आयोगाला माहिती नव्हते का?
३. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी स्वत:च्या इच्छेने पक्ष सोडला होता, तर ते कसे काय चिन्हावर आणि नाववर दावा करु शकतात?
४. २०१८ मध्ये शिवसेनेच्या घटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाने चुकीचे ठरवले आहे. ते कोणत्या आधारावर ते बदल चुकीचे असल्याचे म्हणत आहे?
५. निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. तो निर्णय देत असताना त्यांनी दोन्ही गटांच्या बहुमतांचा विचार केला का?
६. निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपातीपणाचा निर्णय असल्याचे दिसत आहे.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्येही शिवसेनेच्या निधीवर त्यांनी भाष्य केले होते. पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. पक्षनिधी असो वा शिवसेनेची मालमत्ता त्यावर निवडणूक आयोग निर्णय देऊ शकत नाही. तसे केले तर आयोगावर खटला दाखल करु, असे ठाकरेंनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मी १२ आमदारांच्या यादीवर सही केली नव्हती; भगतसिंग कोश्यारींचा मोठा खुलासा
ठाकरे गटालाच मिळणार शिवसेनेचा करोडोंचा निधी आणि सर्व संपत्ती; कायदेतज्ञांनी थेट कायदाच सांगीतला
आधी म्हणाले काहीही झालं तरी ठाकरेंसोबतच राहणार, पण अमित शहा येताच फिरली सुत्रे अन् रात्रीतून..