Share

‘एकनाथराव..! बरं झालं तुम्ही माझ्यापासून दूर गेले, त्यामुळे…,’ उद्धव ठाकरे पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

uddhav thackeray eknath shinde
पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी – विरोधक एकेमकांच्या विरोधात व्यक्तव्य करताना पाहायला मिळाले. याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना त्यांचा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री असा केला होता. यामुळे बरचं राजकारण तापलं.

यावर पावसाळी अधिवेशनातच शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं, “हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलं आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांचं दु:ख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलंय,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे यांनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ असं प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता पुन्हा उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले “बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो गेला. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं नव्हतं. मुख्यमंत्री कोणी असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा चांगली पाहिजे. कंत्राटीपद्धतीने नोकरभरती करण्याचा केंद्राचा निर्णय होता. त्यावर मी म्हटलं पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीवर का नेमू नये? टेंडर काढा आणि मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना नेमा, असं माझं विधान आहे.

मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा थेट एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं आहे. याचबरोबर याच पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी एक मोठी घोषणा केली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी हातमिळवणी केली आहे. तसेच इथून पुढे ते एकत्र काम करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आज ही घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now