Share

‘शिवसेनेत या’; मनसेच्या वसंत मोरेंना थेट मुख्यमंत्री ठाकरेंकडून आमंत्रण; मोरे आमंत्रण स्विकारणार का?

udhav thackeray
गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन शिवाजी पार्क येथे करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेत हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता. यावरून चांगलच राजकारण रंगले. तर दुसरीकडे, पक्षातूनच त्यांच्या भूमिकाला विरोध झाला.

राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिकेच्या उलट भूमिका घेणारे पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडील शहराध्यक्षपद पक्षानं काढून घेतलं आहे. यावरून बरीच चर्चा सुरू असताना या कारवाईबाबत बोलताना वसंत मोरेंना अश्रू अनावर झाले. “अशी कारवाई होईल, असं वाटलंच नव्हतं”, असं वसंत मोरे म्हणाले.

आता पदावरुन मोरे यांना हटवल्यानंतर राजकीय वर्तुळा खलबतं सुरु झाली आहेत. वसंत मोरे यांनी शहराध्यक्ष पद सोडल्यावर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर येण्यास सुरवात झाली आहे. त्यातच एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोरें यांना फोन केला आहे.

”शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा,” अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे मोरें यांनी सांगितले आहे. एका माध्यमाला मुलाखत देताना ते बोलत होते. तसेच मोरे यांना राष्ट्रवादीकडून अजित पवार, शिवसेनेकडून वरूण सरदेसाई, आदित्य शिरोडकर आणि शहराध्यक्ष संजय भोसले यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी मोरे यांना ऑफर देताना म्हणाले की, वसंत कधी काही करणार असला तर माझी आठवण ठेव. तर आमच्याकडे तुमचं स्वागत आहे, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरे यांना फोन करून आपण सेनेत येण्याबाबत विचार करावा असं म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी राज यांना पक्षातूनच धक्के बसण्यास सुरुवात झाली. पुण्यातील एका मुस्लीम कार्यकर्त्याने आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. पुण्यात शाखा अध्यक्ष असलेल्या माजिद अमीन शेख यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now