uddhav thackeray : राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडतं असल्याच पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यातील राजकीय समीकरणच बदलून टाकलं आहे. शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केले आहे.
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक घडामोडी घडतं आहेत. अशातच आणखी एक वेगळी बातमी समोर येत आहे. संभाजी ब्रिगेड-शिवसेना यांच्या साथीला वंचित बहुजन आघाडी येणार का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
नुकतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युतीसाठी शिवसेना आणि काँग्रेसला प्रस्ताव पाठवला आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आंबेडकर यांच्याशी चर्चा केली. मात्र शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये. तर आता २१ नोव्हेंबरला मुंबईतील एका कार्यक्रमात ठाकरे आणि आंबेडकर एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबरला मुंबईत प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येण्याची चिन्हं आहेत. यामुळे आता शिवसेना – वंचित आघाडी येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
तसं पाहायला गेलं तर, २०१९ मध्ये एमआयएमशी युती तोडल्यानंतर वंचितला म्हणावा तसा भागीदार मिळालेला नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व असून आम्हाला ते मान्य आहे, अशी भूमिका आता वंचितने घेतली आहे. त्यामुळे ठाकरेही या युतीवर शिक्कामोर्तब करणार असल्याच बोलल जातं आहे.
समजा उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडी सोबत युती करण्यास हिरवा कंदील दिला तर, शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्यात राजकीय प्रयोगाचा दुसरा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या राजकीय वर्तुळाचे याचबरोबर वंचित आघाडीचे लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे लागलं आहे.
दिराच्या प्रेमात वेडी झाली वहिणी, रात्री नवऱ्याला समोसा खाऊ घातला अन् त्यानंतर…
Maruti suzuki : मारूतीच्या ‘या’ CNG कारचा बाजारात धुमाकूळ; एकाच महीन्यात विकल्या दिड लाखांहून अधिक गाड्या
bachchu Kadu : दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडूंनी रवी राणांना दिला इशारा; म्हणाले, यापुढे वाट्याला गेला तर…