uddhav thackeray lawyers in election committee | शिवसेना निवडणूक चिन्हावरुन सध्या ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. शुक्रवारी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चिन्ह आपलंच असल्याचे म्हटले आहे.
आपली बाजू मांडताना ठाकरे गटाचे वकील म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी स्वत:च पक्ष सोडला आहे. त्यामुळे त्यांचा पक्ष चिन्हावर कुठलाही प्रकारचा दावा असू शकत नाही. ते पक्षातून बाहेर पडले आहे. ते पक्षातून बाहेर पडून मुख्यमंत्री झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत घेऊन बंड केले होते. त्यानंतर त्यांना तब्बल १२ खासदारांचे समर्थनही मिळाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणावर आपला दावा ठोकला होता. पण सध्या तांत्रिकदृष्ट्या पाहिले असता उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे.
शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या वकीलांनी अंतरिम प्रतिक्षापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या ४० आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहे. त्यामुळे ते पक्षाचे सदस्य राहिलेले नाही, असे त्यांनी म्हटले होते.
शिवसेनेच्या कार्यकारणीत २८० जण आहेत. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक जणांच्या पाठिंब्याच्या प्रतिज्ञापत्राचा यात समावेश आहे. तसेच शिवसेनेवर आपलेच वर्चस्व आहे हे उद्धव ठाकरे दाखवण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शिवसेना कोणाची स्पष्ट होताना दिसून येत आहे.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा ठोकत आहे. आपल्यासोबत अधिक नेते आहेत. त्यामुळे आपला गटच खरी शिवसेना आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने दोन स्वतंत्र दसरा मेळावे घेण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
lucknow : ४५ मिनिटांपासून सोसायटीची अडकली होती लिफ्ट, सीसीटीव्हीमध्ये जे समोर आलं ते पाहून अंगावर येईल काटा
Shivsena : ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे ठाकरे गट एकमेकांना भिडले, तुफान राडा, शेवटी निघाला ‘हा’ तोडगा
politics : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी; ठाकरेंना शेवटची २१ तासांची मुदत, अन्यथा…