uddhav thackeray group angry on supriya sule | महाविकास आघाडी सरकार आता राहिलेले नाही. पण महाविकास आघाडीतील नेते अनेकदा सारख्या भूमिका घेताना दिसून येतात. त्यामुळे महाविकास आघाडी निवडणूका एकत्र लढतील अशी चर्चा आहे. पण महाविकास आघाडीतील नेत्यांची नाराजी अनेकदा समोरही आलेली आहे.
आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. संसदेच्या दालनामध्येच महाविकास आघाडीतील नेत्यांमधील मतभेद समोर आले आहे. सुप्रिया सुळेंच्या एका निर्णयाला शिवसेनेसे नेते विरोध करताना दिसून आले आहे.
झाले असे की महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. अशात सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील दोन खासदारांना या बैठकीत नेण्याचा प्रयत्न केला. पण ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला आहे.
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावावरुन वाद सुरु आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सुद्धा राज्याचे राजकारण तापलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या खासदारांची अमित शाहांबरोबर बैठक होणार होती.
या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील दोन खासदारांना नेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला ठाकरे गटातील नेत्यांनी विरोध केला आहे. ठाकरे गटातील विरोधामुळे त्या दोन्ही खासदारांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले आहे.
सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला ठाकरे गटातील खासदारांनी जोरदार विरोधा केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबतची बैठक शिंदे गटातील दोन खासदारांशिवायच पार पडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवचं संघात पुनरागमन, पृथ्वी शॉही करणार धमाका; अजिंक्य रहाणेकडे सोपवलं कर्णधारपद
Rohit Sharma : मी संघासाठी खेळत नाही, तर…; दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर रोहितचं ट्विट व्हायरल
payal : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरूणीने आरोपीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, पण पुढे..