Share

‘शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास भाजपने मातोश्रीवर यायला हवे’, उद्धव ठाकरेंची अपेक्षा

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए कडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. भाजप या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. शिंदे गट देखील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळत आहे.(Uddhav Thackeray expects BJP to come to Matoshri if it wants Shiv Sena’s support)

यादरम्यान सोमवारी मातोश्रीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना(Shivsena) खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मातोश्रीवर यायला हवे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी या बैठकीदरम्यान व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर आमदारांप्रमाणे शिवसेनेचे खासदार देखील बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेत पक्षातील खासदारांच्या भेटी घेतल्या होत्या. काल उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक झाली.

या बैठकीत खासदारांनी एकत्र मिळून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करावे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास शिवसेना तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक अट देखील पक्षातील खासदारांना सांगितली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे असल्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मातोश्रीवर यायला हवे, असे उद्धव ठाकरे यांनी पक्षातील खासदारांना सांगितले. उद्धव ठाकरे यांची ही अट भाजपने नाकारल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मातोश्रीवर जाऊ नये, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा मागण्यासाठी मातोश्रीवर जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पूर्वी भाजप आणि शिवसेनेचे फार घनिष्ठ संबंध होते. पण शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! शिवसेना भाजपला देणार पाठिंबा? उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर ठेवली ‘ही’ अट
पत्रास कारण की…! राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र; ‘या’ कारणामुळे उद्याचा मेळावा रद्द, वाचा सविस्तर
जयंत पाटील कडाडले; ‘मंत्री -संत्री व्हा पण सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, करेक्ट कार्यक्रम करणार’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now