Share

uddhav thackeray : उद्धव ठाकरेंनी केली नव्या नावाची घोषणा, ‘ही’ तीन नावं पाठवली निवडणूक आयोगाला

Uddhav Thackeray

uddhav thackeray decide new name of party  | निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह काही काळासाठी गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांकडून बैठका घेतल्या जात आहे.

दोन्ही गटांना आता दुसरं चिन्ह आणि नाव घ्यावं लागणार आहे. तसेच ते चिन्ह आणि नावं निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. याबाबत उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला तीन चिन्ह आणि तीन नावांचे पर्याय दिले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ तीन चिन्हे आणि तीन नावे निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशुळ, मशाल आणि उगवता सूर्य असे तीन चिन्हे निवडून आयोगाला पाठवली आहे. त्यापैकी निवडणूक आयोग कोणते चिन्ह द्यायचे याबाबत निर्णय घेणार आहे.

तसेच तीन नावही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. पहिलं नाव म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव म्हणजे शिवसेना प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे आणि तिसरं नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे तिन्ही नावे निवडूक आयोगाला पाठवण्यात आली आहे.

तात्पुरत्या स्वरुपासाठी निवडणूक आयोगाला ही नावे आणि चिन्हं पाठवण्यात आली आहे. कारण पक्षाचे चिन्ह आणि नाव हे अंधेरी पोटनिवडणूकीसाठी गोठवण्यात आलेले आहे. आता उद्धव ठाकरेंच्या या नावांवर आणि चिन्हांवर निवडणूक आयोग कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, शिवसेना नाव आणि चिन्हावर बंदी आल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या निर्णायवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, शिवसेनेने कामाला लागले पाहिजे. तसेच शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे असे नाव त्यांनी उद्धव ठाकरेंना सुचवले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचा सल्ला मानल्याचेही म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : ही आपली शेवटची लढाई, त्यानंतर आपण…; जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
Sharad Pawar : चिन्ह-नाव गमावल्यामुळे शिवसेना संपणार? शरद पवारांनी दिली ‘ही’ मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : नाव, चिन्ह जाऊन सुद्धा ‘हा’ हुकूमी एक्का आहे उद्धव ठाकरेंकडं; निवडणूकीतही गाजवणार मैदान

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now