Share

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ‘या’ तारखेला होणार, शिवसेना प्रकरण थेट नव्या सरन्यायाधीशांसमोर?

eknath shinde uddhav thakre
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे.  राज्यातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political Crisis) सुप्रीम कोर्टातील (Supreme court) सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळाचे 29 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे लागलं आहे.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपविले होते. या प्रकरणाची सुनावणी आज होणार होती. मात्र हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती मिळत आहे.

तसं पाहायला गेलं तर, राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी होणं अपेक्षित होतं पण ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आता थेट २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणीची तारीख मागील वेळी कोर्टाने दिली होती.

मात्र दुपारपर्यंत ही याचिका कोर्टाच्या पटलावर लीस्टच करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली असल्याच बोललं जातं आहे. याचबरोबर उद्यापासून उदय ललित हे नवे सरन्यायाधीश असणार आहे. यामुळे सोमवारी त्यांच्यासमोरच या खटल्यावरील पुढील सुनावणी होईल, असं बोललं जातं आहे.

दरम्यान, यामागील सुनावणी दरम्यान, राज्यातील अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपविण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme Court) खंडपीठाने घेतला होता.

एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गट शिवसेनेपासून वेगळा झाल्यावर शिवसेना कोणाची, उध्दव ठाकरे यांची की शिंदेंची यावर चर्चा सुरू आहे. या वादावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत असून आता ही सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-
तिकिटासाठी पैसे नाहीत, म्हणून तरुणाने एसटीच्या पाठीमागे लटकून केला प्रवास; पाहा फोटो
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने केलं ‘हे’ हैराण करणारं काम, बाळा नांदगावकरांनीही केलं कौतूक

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now