Share

‘धर्मवीर’ चित्रपटातील ‘तो’ सीन सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी चित्रपटगृह सोडलं; जाणून घ्या यामागील कारण…

udhav

सध्या सर्वत्र ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघेंचे अनेक किस्से आहेत. त्या किस्स्यांची अनेकदा चर्चाही होत असते. पण आता त्यांच्या जीवनप्रवासावर चित्रपट आला आहे.  धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे  असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

१३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. काल ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पाहण्यासाठी नरिमन पॉईंट येथील आयनॉक्स मल्टिपेक्स चित्रपटगृहात उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय तसंच शिवसेना आमदार- नेत्यांसाठी विशेष स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आले होते.

विशेष बाब म्हणजे या स्क्रिनिंगला उद्धव ठाकरे यांच्यासह यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच शिवसेनेचे मंत्री-नेते एकनाथ शिंदे, पक्षाची काही वरिष्ठ नेते, काही आमदार-खासदारही उपस्थित होते. यासोबतच चित्रपटातील कलावंत, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ अशी टीमही उपस्थित होती.

मात्र ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळलं. चित्रपटात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ‘मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता.’

तसेच यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही चित्रपट पाहातोय असं कुठंच जाणवलं नाही. प्रसाद ओकने अप्रतिम अभिनय साकारला असून आनंद दिघेंच्या सर्व लकबी हुबेहूब साकारल्या आहेत. त्यानं हे सर्व कसं केलं माहीत नाही. पण हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे.’

महत्त्वाच्या बातम्या
आजी – माजी मुख्यमंत्री आखड्यात! मुख्यमंत्र्यांच्या विराट सभेवर बरसले फडणवीस; ‘असा’ केला पलटवार
मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट
काकूची हातसफाई! दुकानातील गर्दीतून असा मोबाइल चोरला, व्हिडिओ बघून विश्वास बसणार नाही
सत्ता आल्यानंतर काँग्रेस घालणार EVM वर बंदी; काँग्रेसचा मोठा निर्णय

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now