राज्यात भाजपाला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. मात्र राज्यात ठाकरे सरकारची स्थापना झाल्यापासून भाजप – शिवसेनामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अशातच मंगळवारी (काल) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. (uddhav thackeray calls telangana cm k chandrashekhar rao)
तर दुसरीकडे तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या होणाऱ्या चौकशीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठीच राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याचे उद्धव ठाकरे यांनी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) (cm k chandrashekhar rao) यांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केल्यानंतर आता इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी देखील मोदी सरकारविरुद्ध वज्रमुठ आवळायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच आपण लवकरच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले होते.
त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना निमंत्रण दिले असून हे दोघे जण 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत भेटणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव हे केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. केंद्रातील भाजपाचे वर्तमान सरकार हे पूर्वीच्या काँग्रेस सरकार प्रमाणेच वागत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
तसेच भाजपा सरकार राज्यांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. देशासाठी एक नवीन राज्यघटना, नवीन राजकीय शक्ती आणि नवीन शासनाची संकल्पना, मुख्यमंत्री केसीआर राव यांनी मांडली होती. अशातच उद्धव ठाकरे यांनी सीएम केसीआर यांना मुंबईत बोलवून घेतले आहे.
त्यामुळे संघराज्याचा न्यायासाठी सीएम केसीआर यांनी सुरू केलेल्या लढ्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला असल्याचे चित्र गडद झाले आहे. तसेच याबाबत काल संजय राऊत देखील पत्रकार परिषदेदरम्यान बोलले आहेत. गेल्या महिनाभरापासून आम्ही काम करत आहोत आणि २०२४ च्या निवडणुका एकत्र लढण्यासाठी सर्व विरोधकांची स्वतंत्र आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे राऊत यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
बप्पी लहरींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख; ट्विट करत म्हणाले..
कलाविश्वाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ गायिकेचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
संजय राऊतांच्या आरोपांवर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘स्वतःच्या खर्चावर बोट ठेवलं जातं तेव्हा…’
”हिजाब अश्लील असेल तर आरएसएसच्या खाकी शॉर्ट्सवरही बंदी घालावी”