Share

uddhav thackeray : भाजपच्या माजी मंत्र्यांनी शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा, म्हणाले आता तुम्ही फक्त…

Uddhav Thackeray

uddhav thackeray big announcement  | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. पण त्यातून ते एक नवी उभारी घेताना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांविरोधात पर्याय शोधताना दिसून येत आहे. अशात काही मोठे नेतेही शिवसेनेत परतताना दिसत आहे.

आता यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय देशमुख हे शिंदे गटातील संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहे. त्यामुळे संजय देशमुखांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाला बळ मिळणार आहे.

तसेच संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेचच मोठी घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. फक्त तुम्ही तारीख ठरवा, मी लगेच येतो, असे उद्धव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

राज्यात जे काही झालेलं आहे, ते महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना पटलेलं नाही. त्यामुळे ज्यांचा आपल्याशी काही संबंधही नाही ते लोक सुद्धा आपल्यासोबत येत आहे. वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्यासोबत येत आहे. तुम्ही फक्त लढा जे होतंय ते आम्हालाही योग्य वाटत नाही, असे लोक मला म्हणत आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले आहे.

तसेच माझे काय होणार? शिवसेनेचे काय होणार हे ठरवणारे तुम्ही आहात. त्यामुळे मला त्याची चिंता नाहीये. पण देशाचे आणि देशातील लोकशाहीचे काय होणार? असा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला विचारला पाहिजे. मी पोहरा देवीच्या दर्शनालाही येणार आहे. फक्त कधी आणि कुठे घ्यायचा यासाठी तारीख ठरवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय देशमुख यांनी १९९९ ते २००९ या काळात दिग्रस मतदार संघाचे नेतृत्व केले आहे.१९९९ मध्ये शिवसेनेने त्यांची विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांनी १२५ मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : आदित्यनी सांगीतलं शिंदेंच्या बंडावेळी कशी होती उद्धवजींची अवस्था; ‘त्यांचे हातपाय थरथरत होते अन्…
raj thackeray : भाजप, शिंदे गटाने नव्हे तर राज ठाकरेंनी पवारांच्या बारामतीला लावला सुरुंग; पुण्यात मनसेत तुफान इनकमिंग
Sanjay rathod : बंडखोर संजय राठोड आणि भावना गवळी दोघांचाही होणार करेक्ट कार्यक्रम; ठाकरेंनी आखलेला खास प्लान झाला ॲक्टीव्ह

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now