uddhav thackeray angry on deepak kesarkar | सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये आहे. अशात शिवसेनेत बंंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच आता शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आले आहे.
उद्धव ठाकरे हे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात बसलेले होते. त्याचवेळी दीपक केसरकर तिथे आले. तेव्हा त्यांना पाहून उद्धव ठाकरे खुपच संतापले. यावेळी उद्धव ठाकरेंनी दीपक केसरकरांना जाबही विचारला आहे.
तुम्ही शाखा ताब्यात घेताय हे काही बरोबर नाही. सत्ता मिळाली आहे तर ती घ्या आणि व्यवस्थित राहा, असे उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकरांना म्हटले आहे. यावर दीपक केसरकरांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि ते तिथून निघून गेले.
शिंदे गटाने बुधवारी मुंबई महापालिकेचं शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेतलं आहे. मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला. यावेळी राहूल शेवाळे, शितल म्हात्रे आणि नरेश म्हस्के यांनी आयुक्त इक्बाल सिंग यांची भेट घेतली होती.
आयुक्तांच्या भेटीनंतर शिंदे गटातील नेते पक्ष कार्यालयाजवळ आले. तिथे त्यांनी यशवंत भास्कर यांच्या नावाचा कागद पेटवला आणि पक्ष कार्यालयावर ताबा मिळवला. यावेळी औपचारिक उद्धाटनही शिंदे गटातील नेत्यांनी केले आहे.
काही महिन्यांपूर्वीचं या पक्ष कार्यालयाचं नुतनीकरण झालं होतं. काही महिन्यांपासून हे कार्यालय बंद होतं. कोरोनानंतर तर हे कार्यालय उघडण्यातही नव्हतं आलं. पण आता शिंदे गटाने या कार्यालयावर ताबा मिळवला आहे. यावेळी शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचेही पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; गंभीर जखमी अवस्थेत तातडीने दिल्लीला हलवले, कार जळून खाक
आईच्या पार्थिवाला पंतप्रधान मोदींनी दिला खांदा; ‘या’ आजारामुळे १०० व्या वर्षी झाले निधन, देश शोकमग्न
nilesh rane : राणेंना नियम कायदे कळत नाहीत; स्वतः निलेश राणेच असं का म्हणाले? वाचा…