राज्याचे मंत्री नवाब मलिकांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे, तर सत्ताधारी नेते यावरुन भाजपवर टीका करताना दिसून येत आहे. (uddhav thackeray angry on bjp)
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावरुन भाजपला टोला लगावला आहे. सत्ताचा दुरुपयोग करुन सत्ता मिळवण्याच्या राजकारणाने देशातलं राजकारण नासावलं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकसत्ताच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सत्ता मिळवा पण लोकशाहीच्या मार्गाने मिळवा. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचे राजकारण नासावलं आहे. या सत्तापिसासूपणामुळे राज्याचे आणि केंद्राचे संबंध बिघडत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
तसेच देशाच्या राजकारणाला चांगली दिशा मिळाली पाहिजे. आम्ही गंगास्नान करुन पवित्र आणि इतर सर्व गटारातले ही वृत्ती वाईट आहे. सत्तेसाठी हिंदूत्वाचा वापर करणे योग्य नाही, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबतच्या युतीबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे, त्यापद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. कुणीच कुणाला बांधिल नसतं.
तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? मी पुन्हा येईल असं म्हणून न येणं हे वाईट असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
परीक्षेत कॉपी केली म्हणून मैत्रिणींसमोर वडिलांनी झाप झाप झापलं; 13 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल..
जिओ फायबरला मात देण्यासाठी ‘या’ कंपनीचा जबरदस्त प्लॅन, अर्ध्या किंमतीत इंटरनेट सेवा
ह्रतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीसोबत थाटणार पुन्हा संसार? लवकरच सात फेरे घेत एकमेकांना देणार वचन