uddhav thackeray and balasaheb mashal symbol history | निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे. पण हा निर्णय काही काळापूरताच असणार आहे. अंधेरीच्या पोटनिवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही वेगवेगळे चिन्ह आणि नाव घेण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी नाव आणि चिन्ह जाहीर केले आहे.
शिवसेनेने मशाल चिन्ह घेतले आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव घेतले आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांची वाटचाल आणखी कठीण होत चालली आहे. निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्हाचे पर्याय देण्यास सांगितले होते. तेव्हाच त्यांनी खुप विचारपूर्वक निर्णय घेतले होते.
उद्धव ठाकरे यांनी खुप चातुर्याने हे पर्याय निवडले होते. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख राहील याची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. सुरुवातीला त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे मागणी अमान्य केली. तरी शिवसेनेला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे.
तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. पण या सर्व गोष्टींचा उद्धव ठाकरे यांनाच फायदा होणार आहे. कारण याचा इतिहाशाचीही खुप संबंध आहे. भाषिक आधारावर देशात राज्यांची निर्मिती झाली होती. मात्र महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.
सुरुवातीला गुजरातनेही मुंबईवर दावा केला होता. त्यामुळे मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून हा लढा उभारण्यात आला होता. या लढ्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील महत्वाची भूमिका निभावली होती.
प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या लेखणीतून या लढ्याला बळ दिले होते. १०७ जणांनी ज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्या लढ्याचं मशाल हेच प्रतिक होतं. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाल्यामुळे याचा फायदा त्यांना आगामी निवडणूकीत होऊ शकतो.
भाजप हा गुजरातधार्जिण पक्षा असल्याचं वारंवार म्हटलं जातं. शिवसेनेच्या नेत्यांकडूनही अनेकदा असा आरोप केला जातो. तसेच जेव्हापाहून केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. तेव्हापासून मुंबईतले अनेक प्रकल्प मुंबईला गेले आहे. तसेच काही महत्वाची कार्यालये सुद्धा गुजरातला जाताना दिसून येत आहे.
आता मशाल हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं प्रतिक असणारं हे चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पुन्हा एकदा प्रादेशिक आणि भाषिक आस्मितेला हात घातला जाऊ शकतो, असे अनेक राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंडखोरी केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार सोडत आहे, असा आरोप केला आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत असे एकनाथ शिंदे हे म्हणताना दिसून येत आहे. पण उद्धव ठाकरेंचे जे चिन्ह आहे, त्याचा थेट बाळासाहेब ठाकरेंशी संबंध आहे.
१९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची स्थापना झाली होती. पक्षाला मान्यता मिळेपर्यंत शिवसेनेकडून विविध चिन्हावर निवडणूक लढवण्यात आली होती. त्यामध्ये उगवता सूर्य, रेल्वे इंजिन आणि मशाल हे चिन्ह सुद्धा होते. १९८५ साली छगन भुजबळ हे शिवसेनेत होते. तेव्हा त्यांनी मशाल या चिन्हावरच विधानसभेची निवडणूक लढली होती आणि ते जिंकलेही होते. मशाल आणि शिवसेना हे नातं खुप जुनं आहे. त्यामुळे याचा उद्धव ठाकरेंना खुप फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Vinayak Raut : ‘एकनाथ शिंदेंबाबत २००३ मध्ये आम्ही ‘ती’ चूक केली, आज त्याचीच फळे भोगावी लागत आहेत’
Abdul Sattar : शिंदे गटातील वाद भर बैठकीत उफाळला! सत्तारांची तुफान शिवीगाळ; शिंदेंनी घेतला काढता पाय
Opinion poll : धनुष्यबाण गोठल्यामुळे उद्धव ठाकरेंना फटका बसणार का? तब्बल ७५ % लोकं म्हणाली…