राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून भाजप – शिवसेनामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
तसेच शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. भाजपने केलेल्या सर्व टीकांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिली.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर निशाणा साधला होता. शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे, असं फडणवीस म्हणाले होते.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याचबरोबर सत्ता असो किंवा नसो आम्ही हिंदुत्वाला सोडणार नाही असंही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच एमआयएम (MIM) पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाबाबत देखील त्यांनी विधान केलं आहे. ‘औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी भाजपला लक्ष केले. इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. एमआयएमने आम्हाला आघाडीची ऑफर दिली आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा, असेही ते भाजपला लक्ष करताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत, काँग्रेसला घरचा आहेर देत सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट
20 वर्षांपासून बागेत पडला होता पुतळा; आजची किंमत ऐकून जोडप्याला बसला धक्का
‘या’ आजारामुळे तरुणीने स्वतःच्या शरीराची लावली वाट; चावून, ओरखडून केली भयंकर अवस्था
भगवंत मान यांच्या पहिल्याचं मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, तब्बल ‘एवढ्या’ पदांच्या भरतीला मंजुरी