uday samant support dipak kesarkar | राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपची सत्ता आहे. असे असतानाही शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.
दीपक केसरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना शिंदे गटाकडून आणि भाजपकडून तंबी दिल्याची माहिती आहे. तसेच त्यांची प्रवक्ते पदावरुन उचलबांगडी होण्याची शक्यताही आहे. अशात बंडखोर आमदार उदय सामंत यांनी एक मोठा खुलासा केला आहे. तसेच त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले असल्याचीही चर्चा आहे.
दीपक केसरकर आणि निलेश राणे यांच्यात सध्या शाब्दिक वाद सुरु आहे. दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. त्यानंतर वाढत्या वादामुळे दीपक केसरकरांना लवकरच पदावरुन हटवण्यात येईल अशी चर्चा आहे. पण आता उदय सामंत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
माननीय दीपक केसरकर हेच आमचे मुख्यप्रवक्ते आहेत. ह्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी शिंदे गटातील नेत्यांनाच आव्हान दिले असल्याचे म्हटले जात आहे.
दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची जी बदनामी झाली, त्यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. पण परिस्थिती ती नव्हती. जे सांगितलं जात होतं, तसं काहीही झालेलं नव्हतं, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते.
तसेच आपण याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रारही केली होती. त्यांनी सर्व गोष्टी समजून आपल्याला योग्य प्रतिक्रिया दिली होती, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. पण त्यानंतर भाजप नेत्यांमध्ये दीपक केसरकर यांच्याबद्दल नाराजी दिसून आली होती.
महत्वाच्या बातम्या-
VIRAL: ‘या’ माणसाच्या अंगात येतोय महीषासुर, प्राण्यांप्रमाणे खातो चारा आणि गवत; पहा व्हिडीओ
Supriya Sule: …तर आगामी निवडणूकीत सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ; महादेव जानकरांनी सांगितला नामी उपाय
Katrina Kaif: कतरिना कैफ बनणार आई? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ व्हायरल होताच, चाहते म्हणाले…