Share

पुण्यात राडा! शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या उदय सामंतांची गाडी फोडली, गद्दार म्हणत चपलांचा वर्षाव

Uday Samant Attack

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर पुण्यात हल्ला झाला आहे. पुण्याहून मुंबईला जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

त्यांच्या गाड्याही फुटतील, असा इशारा शिंदे गटनेते भरत गोगावले यांनी शिवसैनिकांना दिला आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा पुण्यातील कात्रज परिसरात झाली. याच दरम्यान ही घटना घडली आहे.

सभा संपल्यानंतर शिवसैनिक घरी जात होते. याचवेळी मंत्री उदय सामंत येथून निघून जात असल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक केली, चप्पलाही फेकल्या. याचवेळी गद्दार गद्दार’च्या घोषणा दिल्या गेल्या.

पुण्यातील कात्रज परिसरात उदय सामंत मुंबईच्या दिशेने जात असताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर बूट आणि बाटल्यांनी दगडफेक केली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती.

त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे कात्रज चौकातील तानाजी सावंत यांच्या घरी जेवायला गेले होते. सामंतही त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईला जात असताना आदित्य ठाकरेंच्या सभेतून बाहेर पडलेल्या शिवसैनिकांच्या गर्दीत सामंत यांची गाडी सापडली.

उदय सामंतांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीचे मागच्या काचा पूर्णपणे फुटल्या आहेत. घटनेच्या वेळी प्रचंड मोठा राडा झाला.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधला. पुण्याचे पोलीस आयुक्तही सामंत यांच्याशी बोलले. सामंत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. हल्ल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्याबद्दल सामंत यांनी पोलिसांचे आभार मानले.

मात्र या हल्ल्याबाबत त्यांनी कोणावरही संशय घेतला नाही. मात्र कोणी चिथावणी दिली तर त्याचा शोध घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now