Share

IND vs SA: तिकीटासाठी दोन महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंज्या, व्हिडीओ तुफान व्हायरल

दिल्लीत खेळल्या गेलेल्या भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिल्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ७ गडी राखून पराभव झाला. आता दुसरा टी-२० जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. दुसरा सामना कटक येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी कटकमध्ये तिकीट विक्रीदरम्यान गोंधळ उडाला होता आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला रांगेच्या पुढे आल्या आणि त्यानंतर जमावाने गोंधळ घातला आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला. याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही महिला रांगेच्या पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ झाला, त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त प्रमोद रथ म्हणाले, सुमारे ४०,००० लोक काउंटरवर उपस्थित होते तर १२,००० तिकिटांची विक्री सुरू होती. तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना यावेळी सौम्य बळाचा वापर करावा लागला. व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कशाप्रकारे तिकिटांसाठी ओढाताण केली जात आहे.

कटकच्या बाराबती स्टेडियमवर बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे, त्यामुळे प्रेक्षक स्टेडियममध्ये बसून हा सामना पाहण्याची एकही संधी सोडू इच्छित नाहीत. २०१७ पासून कटकमध्ये एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना झाला नाही. त्याच वेळी, २०१९ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला. तेव्हापासून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात क्रिकेट खेळले जात नव्हते. पण आता हा खेळ देशभर सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षक संधी हातातून जाऊ द्यायचे नाहीत.

दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे तर, भारताने आफ्रिकेला २१२ धावांचे मोठे लक्ष्य पाठलाग करण्यासाठी दिले होते, जे आफ्रिकेने ५ चेंडू बाकी असताना सहज गाठले. T२० मध्ये भारताला २०० पेक्षा जास्त धावांचा बचाव करता आला नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वतीने डेव्हिड मिलरने आयपीएलमधील उत्कृष्ट फॉर्म कायम राखताना धमाकेदार खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.

महत्वाच्या बातम्या-
लिलावात अनसोल्ड राहिला होता हा खेळाडू, हार्दिक पांड्याने दाखवला विश्वास अन् गाजवले मैदान
दिनेश कार्तिकसोबत हार्दिक पांड्याने निभावली मैत्री, स्वता कार्तिकने केले कौतुक, म्हणाला
ट्रॉफी जिंकताच हार्दिक पांड्याचं घरी झालं जंगी स्वागत, भाऊ क्रुणालने अशी केली होती तयारी
VIDEO: कोच आशिष नेहरा हार्दिक पांड्याला म्हणाला खोटारडा, जाणून घ्या मुलाखतीदरम्यान काय घडलं?

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now