नव्या पक्षाची घोषणा करणाऱ्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Mundhe) यांच्या पत्नी करुणा मुंडे(Karuna Mundhe) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत. त्यामुळे त्याही लवकरच आपल्यासोबत येणार आहेत, असा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे.(two-state-ministers-wife-are-in-my-contact-karuna-munde-new-statement)
महाविकास आघाडी सरकारमधील या मंत्र्यांची नावे जाहीर करण्यास मुंडे यांनी नकार दिला. पण त्यातील एक राष्ट्रवादीचा आणि दुसरा शिवसेनेचा मंत्री असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी ‘शिवशक्ती सेना’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. अहमदनगरमध्ये ३० जानेवारी २०२२ ला या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे मुंडे यांनी यापूर्वी सांगितले होते.
आता करुणा मुंडे यांच्या नव्या पक्षाची स्थापना कोरोनामुळे लांबणीवर पडली आहे. आज करून करुणा मुंडे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी नगरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या,” माझ्यावर जी परिस्थिती आली, ती अनेक मंत्र्यांच्या कुटुंबातही आलेली आहे. राज्यातील विद्यमान दोन मंत्र्यांच्या पत्नी आपल्या संपर्कात आहेत.
राज्यातील विद्यमान दोन मंत्र्यांच्या पत्नी आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांची नावे आताच जाहीर केली जाणार नाहीत. नगरमध्ये पक्षाची स्थापना केली जाईल, तेव्हा सगळे स्पष्ट होईल, असे करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांना त्यांच्या राहणीमानावरून प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी त्या म्हणाल्या, “मी राजकारणात येऊ नये म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण एकदा राजकारणात आल्यावर मागे वळायचे नाही, असे मी ठरविले आहे. मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका २५ हजारांच्या साड्या परिधान करतात. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या कपाटात तीन कोटींच्या साड्या आहेत. पण माझ्याकडे कपाटात पाच लाखांच्याही साड्या नाहीत”, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, न डगमगता माझे कार्य पुढे सुरू ठेवणार आहे. आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही येणार आहेत. त्यासाठी आमची त्यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. करोनाचे संकट कमी झाल्यावर नगरमध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार आहे, असेही या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
फक्त २४ रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदार झाले लखपती, २३ दिवसात १ लाखांचे झाले ३.७५ लाख
रवी शास्त्री यांचा खळबळजनक दावा; ‘आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, पण…’
सलमानचा फार्म हाऊस गुन्हेगारीचा अड्डा? लहान मुलांची तस्करी, कलाकारांचे मृतदेह; सलमानवर गंभीर आरोप