ncp : राष्ट्रवादीच्या गोटातून एक खळबळजनक वृत्त हाती येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अशातच आता राष्ट्रवादी – कॉंग्रेसमध्ये देखील गळती लागल्याच चित्र आता पाहायला मिळत आहे.
सध्या राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांना न्यूमोनियाची लागण झाली असून ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशातच पवारांना धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे.
पक्षातील दोन नेत्यांनी राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच राष्ट्रवादीच्या चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला आहे.
हे दोन राजीनामे पक्षासाठी धोका असल्याच बोललं जातं आहे. अनेकदा बेबीताई उईके यांच्या प्रामाणिक कार्याचे खुद्द शरद पवार यांनी कौतुकही केलं आहे. मात्र असं असलं तरी देखील आता त्यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे वैद्य यांनी देखील अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पदाधिकाऱ्याची नियुक्ती करताना वैद्य यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वैद्य पक्षावर नाराज होते. या नाराजीमुळे राजेंद्र वैद्य यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, पवारांची प्रकृती स्थिर असून उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी दिली. मात्र, असं असलं तरी देखील पक्षात सध्या अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. यावर अद्याप राष्ट्रवादीमधील जेष्ठ नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज