pratapgad : आता महाराजांच्या गडावरही अतिक्रमन; प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाशिवाय आणखी दोन कबरी आढळल्या

two more grave found nearby pratapgad  | गडाच्या आणि किल्ल्याच्या परिसरात अनेकदा हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येत असतात. कधी पुरातनकालीन वस्तु सापडते, तर कधी दागिने. अशात इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडाबाबतही एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे.

या किल्ल्याच्या पायथ्यालगत दोन कबरी आढळल्या आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि सय्यद बंडा या दोघांशिवाय आणखी दोन कबरी सापडल्या आहे. अनधिकृत बांधकाम पाडत असताना या दोन्ही कबरी कर्मचाऱ्यांना आढळून आल्या आहे.

संबंधित कबरींपैकी एक कबर सेवेकऱ्याची असण्याची शक्यता आहे. तर दुसरी कबर ही शिवकालीन नसल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कबरी या अलीकडच्या काळातीलच असल्याचे बोलले जात आहे. पण या कबरीवर कोणतीही माहिती दिलेली नसून जिल्हा प्रशासन त्याबाबत चौकशी करत आहे.

प्रतापगडाजवळ असलेल्या परिसरात अतिक्रमन असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ते हटवण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. अशात अफजल खान कबरीजवळ असलेले अतिक्रमन प्रशासनाचे कर्मचारी हटवत होते. त्यावेळी त्यांना याठिकाणी दोन कबरी आढळून आल्या.

बुलडोझर फिरवल्यानंतर कबरीचं पुर्व रुप दिसून आलं आहे. आणखी दोन कबरी आढळून आल्याने कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला होता. तेव्हापासून तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

अनेकदा शिवप्रेमी असलेल्या संघटनांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी विरोध केला होता. त्यानंतर न्यायालयाने सुद्धा हे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. २२ वर्षांपासून हिंदृत्ववादी संघटना याबाबत मागण्या करत होत्या. अखेर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हे पाडण्याचे काम सुरु केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Cricket: इंग्लंडकडून पराभव झाल्यावर रोहित ढसाढसा रडत होता, खेळाडू बॅगा भरत होते; मध्यरात्री तो मेसेज आला अन्…
sachin tendulkar : भारताच्या पराभवानंतर सचिनने केले हैराण करणारे ट्विट; म्हणाला, जसा विजय साजरा केला तसा…
shoaib malik : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे तुटलंय शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचं नातं? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा