Share

Sonali Phogat : सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, आणखी दोन जणांना अटक, धक्कादायक माहिती आली समोर

Sonali Phogat

Sonali Phogat : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचे बोलले जात होते. परंतु, हा मृत्यू संशयास्पद असून त्यांचा खून केला असल्याचा दावा सोनाली यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच कुटुंबीयांनी याप्रकरणी तक्रारही दाखल केली.

गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग या दोघांना अटक केली होती. त्यांनतर आता आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

यामध्ये सोनाली फोगाट यांना सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी जबरदस्तीने ड्रग्स पाजले असल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी शुक्रवारी त्या दोघांना अटक केले होते. सोनाली फोगाट यांना ड्रग्स दिल्याची कबुलीही या आरोपींनी दिली.

तसेच पोलिसांनी क्लबच्या बाथरूममधून ड्रग्जही जप्त केले. त्यानंतर आता याप्रकरणी आणखी दोघांना आज अटक करण्यात आली आहे. या दोन आरोपींपैकी एक हा अंजुना येथील हॉटेलचा मालक आहे, तर दुसरा आरोपी हा ड्रग्ज पेडलर असल्याचे सांगण्यात येत आहे.

आतापर्यंत सुधीर सांगवान, सूखविंदर सिंह, हॉटेलचा मालक आणि ड्रग पेडलर या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गोव्यातील विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी सोनाली फोगाट यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडून व्हायला हवा, अशी मागणी केली आहे.

२००६ पासून सोनाली फोगाट यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. हिसार दूरदर्शनमध्ये त्या अँकरिंग करत होत्या. त्यानंतर २००८ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच त्या भाजपच्या सक्रिय सदस्य होत्या.

महत्वाच्या बातम्या
Tea : ३९ वर्षांपासून दिवसभरात केवळ दोन कप चहा घेऊन जिवंत आहेत ‘साध्वी’, डॉक्टरही संभ्रमात
छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नेमकं काय घडलं?
Ramya Krishnan: ..त्यामुळे साऊथ इंडस्ट्री सोडून मी बॉलीवूडमध्ये थांबले नाही, बाहुबलीमधील शिवगामीचा मोठा खुलासा
Pawandeep Rajan: इंडियन आयडल फेम पवनदीप राजन बनला संगीतकार, पहिल्यांदाच ‘या’ चित्रपटासाठी बनवलं संगीत

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now