औरंगाबाद येथील पैठण या बस स्थानकावर दोन मुली एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलींनी स्थानकावर एवढा गोंधळ घातला की बघ्यांची तुंबळ गर्दी त्या ठिकाणी झाली. विशेष म्हणजे या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत.
माहितीनुसार, त्यांच्या भांडणाचे कारण म्हणजे, या दोन्ही मुलींचा बॉयफ्रेंड एकच आहे. एका मुलीने बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत फिरताना बघितल्याने ती पैठण बस स्थानकात पोहोचली. दोघींमध्ये बॉयफ्रेंड कोणाचा यावरून जोरदार भांडण झालं आणि मोठा राडा झाला. हा गोंधळ खूप वेळ चालला होता.
बॉयफ्रेंडवरून दोन्ही मुली बस स्थानकाच्या आवारातच भिडल्या. वादानंतर दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली. भर गर्दीत सर्व प्रकार सुरू होता. वाढती गर्दी आणि प्रकरण चिघळत असल्याचे पाहून तरुण पळून गेला. बस स्थानकात दोन्ही मुलींमधील हा राडा जवळपास अर्धा तास सुरू होता.
त्यानंतर, दोन्ही मुलींमध्ये सुरू असलेली हाणामारी घटना बस स्थानकात तैनात असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी दोघी मुलींना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा दोघींमधील मारहाणीचे कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला.
माहितीनुसार, दोन्ही मुलींचे एका मुलावर प्रेम आहे. तो बॉयफ्रेंड माझाच असल्याचा दावा त्या दोघी पोलिसांसमोर करत होत्या. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्या एका हायस्कूलमध्ये शिकतात. पण दोन्ही मुलींवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी सर्वाजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी या दोन मुलींवर कारवाई केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या या घटनेची औरंगाबाद शहरात चर्चा सुरू आहे. दोन्ही मुलींचा बॉयफ्रेंड एकच असल्यामुळे दोन्ही मुलींमध्ये वाद, हाणामारी झाली मात्र संबंधित मुलींचा बॉयफ्रेंड पळून गेला.