मित्राच्या लग्नाला गेलेले नाशिकचे दोन तरुण होटेलमध्ये मुक्कामाला राहीले. तिथे त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मित्राच्या लग्नाला गेले असता, हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे आग लागली.ज्या दिवशी आग लागली त्याच दिवशी या आगीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच एकावर उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
बादशाह परवेज शेख (वय २६) आणि प्रकाश सुधाकर दाते (वय ३०) असे या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोन तरुण मित्राच्या लग्नाला गेले असता ही भयानक घटना त्यांच्यासोबत घडली. सातपुर येथील हॉटेल संचालकाच्या मुलाच्या लग्नासाठी उत्तरप्रदेशमध्ये प्रतापगड येथे गेले होते. ८ डिसेंबरला उत्तर प्रदेशात लग्न होते.अशी माहीती मिळाली आहे.
याच लग्नासाठी सातपुर येथील अजुन ७ तरुण एकाच वाहनातून गेलेले होते. लग्न झाल्यानंतर ते लखनौला फिरण्यासाठी गेले. तिथे त्यांनी एक रुम घेतली होती. फिरण्यासाठी गेले असता त्यांनी तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. हॉटेलच्या खाली असलेल्या बिर्यानीच्या कॉर्नरवर प्रकाश आणि बादशाह दोघही बिर्यानी खाण्यासाठी त्या रात्री गेले होते.
याच बिर्यानी कॉर्नरवर गेले असता तिथे गॅस गळतीमुळे भयानक आग लगली होती. या आगीत प्रकाश जास्त भाजल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. बादशाह शेख हा 70 टक्के भाजला गेला असुन त्याला रुग्नालयात भरती करण्यात आले आहे. लखनऊ येथील रुग्नालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
यासगळ्या प्रकाराची माहिती त्यांच्या घरी कळवण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांनी लगेच लखनऊकडे धाव घेतली. परंतु बादशहाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाआहे. प्रकाश दाते आणि बादशहा हे दोघेही सर्वसामन्य घरातील होते. नाशिक येथिल सातपुर परिसरात वास्तव्याला होते. प्रकाश दाते हा तरुण सातपुर येथे बँकेत नोकरीला होता.
प्रकाशाच्या पश्चात आई, वडील,बहिन,पत्नी आणि दोन मुलं असा परीवार आहे. तर बादशहा हा अविवाहीत असुन त्याचे वडील सातपुरमध्ये पान विक्रिचा व्यवसाय करतात. या घटनेमुळे दोघांच्याही परिवारावर दुक्ख चा डोंगर कोसळला आहे. मात्र या दोन तरुणाच्या मृत्यूनेसातपुर तालुक्यात शोकाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या
‘माझा घात-अपघात होऊ शकतो’; शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडले अन् रचला अपघाताचा बनाव; ‘या’ कारणामुळे सत्य आले समोर
धनंजय मुंडेचा भीषण अपघात; गंभीर जखमी अवस्थेत एअर ॲम्बुलन्सने मुंबईला हलवले






