शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माझा घातपात किंवा अपघात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. या घातपाताची माहिती अधिकाऱ्याकडून मिळाली असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.
चंद्रपूर शहरात झालेल्या त्यांच्या भाषणात हे वक्तव्य त्यांनी केले आहे. माझी चौकशी व्हावे असे काहीच मिळत नाही आहे म्हणून माझा अपघात करण्याचे प्रयत्न आहेत. अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी त्यांच्या भाषणात केला आहे.
महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे चंद्रपूर येथे व्याख्यान होते, तेथे त्या बोलत होत्या. चंद्रपूरमधील सामाजिक संस्थांनी मिळून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी महापुरुषांवर केले जात असलेले राजकारण त्यावर त्या प्रखरपणे बोलल्या आहेत.
महापुरुषांचा अपमान होत असला तरी सरकार काहीच करत नसून काही लोकांना महापुरुषांच्या यादीत बसवण्याचे काम देखील राजकारणी करत आहे असा आरोप त्यांनी त्यावेळी केला. हे सगळं जाणीवपूर्वक केले जात आहे असेही त्या म्हणाल्या.
सरकारला बहुजनांच्या आणि पुरोगामी विचारांच्या महापुरुषांची ओळख पुसून टाकायची असून हेडगेवार-गोळवलकर यांच्यांबद्दल लोकांना सांगायचे आहे, असा त्यांनी आरोप प्रखरपणे केला आहे. परंतु जे हा अपमान करत आहेत त्यांच्यावर शाई फेकण्यास त्यांनी विरोध केला आहे.
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर शाई फेकण्यापेक्षा ती जमा करा आणि निवडणुकीच्या वेळी तीच शाई बोटावर लावा. जेणेकरून अशा महापुरुषांना अपमानीत करणार्यांना पराभूत करून धडा शिकवता येईल असे त्या त्यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
shivsena : मी हात जोडून तुमची माफी मागते पण आता तरी…; सुषमा अंधारे इतक्या का नरमल्या? वाचा…
Shivsena : संस्थापक शिवसैनिकांपैकी एक असलेल्या जेष्ठ नेत्याने सोडली शिवसेना, ठाकरे गटात उडाली खळबळ
जर तुझा बाप सुषमा अंधारेचा पती नसता तर तर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टेजवर बोलावलं असतं का?