Share

देशसेवा केल्यानंतर माजी सैनिकांनी केली जिरेनियमची शेती, कमावले लाखो रुपये, वाचा यशोगाथा

geranium

अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही यशोगाथा तरुण शेतकऱ्याची नसून दोन माजी सैनिकांची आहे. देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या या माजी सैनिकांनी शेतीत अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मेहेकरी येथील हे दोन माजी सैनिक आहेत. सध्या सर्व स्तरातून यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

तर जाणून घेऊ या सविस्तर.. गोपीनाथ डोंगरे आणि महेंद्रसिंग चौहान अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहे. हे अहमदनगर जिल्ह्यातील मेहेकरी राहतात. विशेष बाब म्हणजे हे दोघेही माजी सैनिक आहेत. देशसेवा केल्यानंतर देखील हे स्वस्त बसले नाही. या दोन्हीही माजी सैनिकांनी आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला.

तसेच सुरुवातीला त्यांनी वडिलोपार्जित शेतीत कांदा, ज्वारी, गहू यासारखी पारंपरिक पिकं घेतली. मात्र, पारंपरिक पिकांमधून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी जिरेनियमचं पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी एक एकर शेतात जिरेनियमचे दहा हजार रोपं लावली.

याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला रोपांसाठी आणि इतर मशागतीसाठी त्यांना सत्तर हजारांचा खर्च आला आहे. मात्र, त्यानंतर चार वर्षे हे पीक घेता येतं. खास बाब म्हणजे, या पिकातून या दोन माजी सैनिकांना तीन महिन्यांना एक ते सव्वा लाखाचं उत्पन्न मिळत आहे.

दरम्यान, जिरेनियमचा महिलांची सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये वापर होत असल्याने बाजारात त्याची चांगली मागणी असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. जिरेनियमची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी या माजी सैनिकांच्या शेताला भेट देत आहेत. तसेच त्यांच्याकडून पिकाची माहिती देखील मिळवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
दुर्दैवी अंत! शौचालयाच्या टाकीत बुडून तीन तरूणांचा मृत्यु, पु्ण्यातील धक्कादायक घटना
टिम इंडियाला मिळाला बेन स्टोक्ससारखा घातक ऑलराऊंडर, वर्ल्ड क्रिकेटवर करणार राज
मुंबई-पुणे महामार्गावर वाहनाचा विचित्र अपघात, २२ जण टपावरुन कोसळले
बॉलीवूडची बोल्ड ब्युटी मल्लिका शेरावतने शेअर केले सोशल मिडीयाला आग लावणारे फ़ोटो; पाहून थक्क व्हाल

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट राज्य

Join WhatsApp

Join Now