Share

तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर फोटो टाकत असल्याने दोघा भावांनी बहिणीची गळा आवळून केली हत्या

नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २८ वर्षीय बहिणीचा खून तिच्या दोघा भावांनी केल्याची घटना घडली आहे. खून करण्याचे कारण ऐकल्यानंतर तुम्हांला नक्कीच धक्का बसेल. सध्या या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव सुलताना फारुख खान आहे. ती नवी मुंबईतील उलवे सेक्टर-१९ मध्ये राहत होती. तिच्या दोन भावांनी तिचा गळा आवळून खून केला आहे. सलमान मोहम्मद फारुख खान वय २० आणि शाहरुख मोहम्मद फारुख खान वय २२ वर्ष अशी या दोघा भावांची नावं आहेत.

NRI पोलिसांनी या दोघांना उत्तरप्रदेशमधील मेरठ येथून अटक केली आहे. पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलताना हिने दोघा भावांना पैसे पाठविणे बंद केले होते. तसेच ती तोकडे कपडे घातलेले फोटो सोशल मिडीयावर टाकात असल्याने समाजात बदनामी होत असल्यामुळे या भावांनी हे कृत्य केले. तशी कबुली देखील या भावांनी दिली आहे.

घडलेली घटना सविस्तर म्हणजे, सुलताना ही कोपरखैरणेतील बेला बारमध्ये कामाला असताना, कळंबोली येथे राहणाऱ्या रोहन हमंत वय २५ वर्षे या हॉटेल व्यावसायीकासोबत तिची चांगली मैत्री झाली. २५ मे रोजी सुलताना आणि रोहन या दोघांनी उलवे येथील घरामध्ये जेवण केल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास रोहन कळंबोली येथे आपल्या घरी निघून गेला.

त्यानंतर रोहनने मध्यरात्रीच्या सुमारास सुलतानाच्या मोबाईलवर अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सुलताना हिच्याकडुन कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने दुसऱ्या दिवशी सायंकाळी रोहन सुलतानाच्या घरी गेला. सुलताना आपल्या घरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळुन आली.

रोहनने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. तपासादरम्यान सुलतानाच्या घरी २५ मे रोजी रात्री तिचे दोघे भाऊ येऊन तत्काळ मेरठ येथे आपल्या गावी निघुन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांच्यावर संशय व्यक्त करत पोलिसांच्या सदर पथकाने मेरठमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने सुलतानाच्या दोघा भावांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. दोघांनी खून केल्याची कबुली दिली.

क्राईम

Join WhatsApp

Join Now