Share

महाराष्ट्र हदारला! भाविकांवर काळाचा घाला, दोन वेगवेगळ्या अपघातांत ९ ठार, २१ जण जखमी

crime

दोन वेगवेगळ्या अपघातांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र हदारला आहे. या दोन भीषण अपघातांमद्धे ९ भाविकांचा मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक अपघात शेगाव येथे झाला असून एक सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ झाल्याची माहिती मिळत आहे.

हे दोन्ही अपघात रविवारी ( दि.१३) रोजी मध्यरात्री आणि सोमवारी (दि. १४) सकाळच्या दरम्यान घडले आहेत. शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. तर दुसऱ्या अपघात हा सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ वारकरी घेवून जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव मालट्रकने ठोकल्याने झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातात 4 वारक-यांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकचं टार फुटलं आणि ते वारक-यांच्या गाडीवर आदळलं. ही वारकरी पंढरपूरला जात असताना सोलापुरातल्या कोंडी इथं ही भीषण दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत.

दरम्यान, तर दूसरा अपघात शेगाव येथे झाला आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवर देऊळगाव राजा नजीक बोलेरो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ५ भाविक ठार तर ४ जखमी झाले. जखमीवर देऊळगाव राजा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी (दि.१४) रोजी सकाळी ६ वाजता घडली. मृतकांमध्ये बोलेरो चालक, १ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींवर देऊळगाव राजा व जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या
ऑनलाईन क्लास दरम्यान शिक्षकाचे सुरू होते घाणरडे कारनामे; समोर येताच गमवली नोकरी
“योगी, महाराजांची जागा मंदिरात आणि मठात, ते राजकारणात आल्याने देशाचे वाटोळेच होते”
पर्यटकांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला, मग मधमाश्यांनीही दाखवला इंगा; २५० लोकांना घेतला चावा
‘‘महाराष्ट्राच्या जनतेने गेल्या ५५ वर्षांत मला एका दिवसासाठीही रजेवर पाठवलेले नाही यासाठी मी त्यांचा ऋणी’’

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now