Share

तुझ्या मुर्ख बायकोला समजाव नाहीतर.., ट्विंकलच्या ‘या’ कृतीमुळे अक्षयकुमारवर भडकले लोकं

The Kashmir Files

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता लवकरच एक महिना पूर्ण होईल. परंतु, अद्यापही हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २४० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. यादरम्यान या चित्रपटासंबंधित एक पोस्ट शेअर केल्यामुळे अभिनेत्री ट्विंकल खन्ना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

ट्विंकल खन्नाने एका दैनिकात ‘द काश्मीर फाईल्स’संदर्भात एक लेख लिहित चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’प्रमाणे विविध शहरांच्या नावावर सध्या अनेक चित्रपट निर्माते चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटांच्या नावांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांची धावपळ सुरु आहे. मीसुद्धा विचार करत आहे की, नेल फाईल्स नावाचा चित्रपट बनवू, अशा आशयाचा लेख तिने यामध्ये लिहिला होता.

एवढेच नाही तर यानंतर तिने चित्रपटाची खिल्ली उडवणारी एक पोस्टसुद्धा शेअर केली आहे. परंतु, ट्विंकलच्या या लेखानंतर आणि पोस्टनंतर लोक तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. केवळ ट्विंकलच नाही तर लोकांनी अक्षय कुमारलाही यावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तर निर्माते अशोक पंडित यांनीसुद्धा ट्विंकलच्या या पोस्टवर तिला प्रतिक्रिया देत तिच्यावर टीका केली.

https://twitter.com/ashokepandit/status/1510954232186564608?s=20&t=_GNU5FarOPL8mXan9P3kLg

त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘मॅडम तुम्ही खूप लेट झालात. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावरील या चित्रपटाने यापूर्वीच किमया केली आहे. तुम्हाला विनंती करत आहोत की, ७ लाख काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर इतकं असंवेदनशील बनू नका’. अशोक पंडित यांच्या या ट्विटनंतर लोकांनी अक्षय कुमारचेही नाव घेत ट्विंटकलला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एकाने अशोक पंडित यांचा ट्विट रिट्विट करत लिहिले की, अक्षय कुमारजी कृपया तुमच्या मुर्ख पत्नीला समजावा नाहीतर ती तुम्हाला रस्त्यावर घेऊन येईल. स्वतः तर फ्लॉप आहे. तिला आयुष्यात कोणताच काम धंदा मिळाला नाही. आणि आता घरी बसून तिचा मुर्खपणा दाखवत ती तुम्हालासुद्धा रस्त्यावर आणेल. जरा समजावा तिला.

https://twitter.com/Vinnu815101351/status/1510979079264423936?s=20&t=_GNU5FarOPL8mXan9P3kLg

दरम्यान, अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’संदर्भात एक ट्विट करत अनुपम खेर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर खूप दिवसांनी अक्षयने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे अनेक लोकांनी त्याला ट्रोल केला होता. लोकांचे म्हणणे होते की, अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची मदत घेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
आयुष्यात दोनच गोष्टी गरम हव्या, एक जेवण आणि दुसरी.., कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्याची घसरली जीभ
..त्यामुळे राम गोपाल वर्मांचा संसार झाला उद्ध्वस्त, पत्नीने ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीला केली होती मारहाण
भर उन्हाळ्यात चाहत्याने केली थंडगार बिअरची मागणी, सोनू सुद म्हणाला, बिअरसोबत.., वाचून लोटपोट व्हाल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now