बॉलिवूडच्या पॉवर कपलमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या नावाचा समावेश होतो. चाहत्यांना अक्षय आणि ट्विंकलची जोडी खूप आवडते. 17 जानेवारी 2001 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. आता दोघांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 20 वर्षांत या दोघांमधील प्रेम कधीच कमी होताना दिसल नाही. जोडप्याने चाहत्यांसाठी गोल सेट केले.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना नेहमीच चर्चेत असतात. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत आणि नेहमी एकमेकांची प्रशंसा करत असतात. मात्र, काही वेळा दोघेही एकमेकांना उघडपणे एक्सपोज करण्यासाठीही ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला या जोडप्याचा असाच एक किस्सा सांगत आहोत.
ट्विंकल खन्नाने तिच्या पतीच्या फॅशन सेन्सचा खुलासा करताना सांगितले होते की, ‘अक्षयकडे माझ्यापेक्षा जास्त पादत्राणे आहेत. इतकंच नाही तर त्याच्या वॉर्डरोबमध्ये गुलाबी, हिरवा, जांभळा आणि पिवळा कलरच्या पॅन्टचे कलेक्शन आहे. हे ऐकून अक्षयने सांगितले की, त्याच्या पत्नीने त्याला पॅन्टचे कलेक्शन आणण्यास सांगितले होते. तेव्हा ट्विंकल म्हणते की ती नक्कीच म्हणाली होती पण संपूर्ण इंद्रधनुष्य विकत घ्यायला नाही.
ट्विंकल पुढे म्हणते, अक्षयकडे 350 जोडी शूजही आहेत. संभाषणादरम्यान, जेव्हा ट्विंकलला विचारण्यात आले की कोण तयार होण्यासाठी जास्त वेळ घेते, त्यावर अभिनेत्रीने स्वतःचे नाव घेतले. त्याचवेळी ट्विंकल खन्नाने असेही सांगितले होते की, ती तयार होण्यासाठी कोणाचीही मदत घेत नाही, तर अक्षयला तयार करण्यासाठी त्याच्यासोबत 11 लोकांची टीम असते त्यामुळे तो वेळेवर तयार होतो.
लग्नानंतर ट्विंकलने तिच्या अभिनय कारकिर्दीला कायमचा निरोप दिला आहे. आता देखील अभिनेत्री मुलगा आरव आणि मुलगी नितारा या दोन मुलांची आई आहे तसेच लेखक आणि इंटेरिअर डिझायनर म्हणून सक्रिय आहे. ट्विंकल मिसेस फनी बोन्स या नावाने लिहिते. वृत्तपत्रांतून ती व्यंगात्मक लेखही लिहिते.
अक्षयच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसला होता. अनेक कलाकार एक-दोन प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम करताना दिसत असतात तर अक्षय कुमार एकाच वेळी अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहे, तर अनेक चित्रपट बाकी आहेत. ‘बच्चन पांडे’ व्यतिरिक्त अक्षयच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतू’ यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
अभिनेता वरूण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
कार्यक्रमात बोलताना मोदींची जीभ घसरली, बेटी पढाओच्या ऐवजी म्हणाले बेटी पटाओ; व्हिडिओ व्हायरल
‘आई कुठे काय करते?’ मधील अरूंधतीच्या रिअल लाईफ मुलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव; पहा व्हिडिओ
‘या’ तारखेपासून राज्यातील सर्व शाळा होणार सुरु; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय