Share

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’मधल्या आदितीचा झाला साखरपुडा, होणारा नवरा करतो ‘हे’ काम

Amruta Pawar

झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत अदिती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अमृता पवार (Amruta Pawar). आपल्या अभिनयाद्वारे अमृता प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. तर आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमृता पवारचा साखरपुडा झाला असून तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमृता पवारने तिच्या इन्स्टा स्टोरीला तिच्या साखरपुडा समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी, कुटुंबीयांनी स्टोरीला ठेवलेले फोटो तिने तिच्या इन्स्टा स्टोरीला शेअर केले आहेत. साखरपुडा समारंभासाठी अमृताने सुंदर गोल्डन आणि जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर साजेसे गोल्डन दागिने, माथ्यावर टीळा आणि चेहऱ्यावर हास्य अशा अंदाजात अमृता फारच सुंदर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Cb7i0LItSCh/

अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव नील पाटील असे आहे. नील हा बायोमेडिकल इंजिनियर आहे. तर नीलने साखरपुडा समारंभासाठी हाफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे. अमृताच्या साखरपुड्याचे हे फोटो समोर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या अनपेक्षित बातमीने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.

https://www.instagram.com/p/Cb9RvnLKQQf/

अमृताने ‘दुहेरी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘ये रे ये रे’ या डान्स शोमध्ये सहभाग घेतला. त्याच वर्षी तिने ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासित मालिकेत काम करण्यास सुरुवात केली. या मालिकेत तिने जिजामातांची भूमिका साकारली.

सध्या अमृता ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती अभिनेता हार्दिक जोशीसोबत दिसत आहे. हार्दिक जोशी हा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे खूपच लोकप्रिय झाला होता. या मालिकेतील राणादा ही त्याची भूमिका चांगलीच गाजली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
..त्यामुळे सागर कारंडेने लोकलच्या ट्रेनमधून धक्के खात केला प्रवास, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
बॅक टू बॅक दोन चित्रपट फ्लॉप होऊनही बाहुबली प्रभासला मिळाली हॉलिवूडची ऑफर; बनणार सुपरहिरो?
‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मधील ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now