आपण बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये भांडण, रुसवे – फुगवे, ब्रेकअप आणि एकमेकांची काळजी करताना पहिले असेल किंवा ऐकले असेल. नात्यात प्रेमाचा बहर आणण्यासाठी ही जोडपी कुठल्याही थराला जाऊ शकतात. परंतु ब्रेकअप झाल्यानंतर कशा प्रकारे एकमेकांसोबत वागतील, याचा कुणालाच थांगपत्ता नसतो.
असेच काहीसे चीनमध्ये घडले आहे. एका प्रियकराने ब्रेकअपनंतर त्याच्या प्रेयसीकडून चक्क ब्रेकअप करण्याची फी घेतली आहे. सध्या या प्रकरणावर जोरदार चर्चा होत आहे. भारतीय रकमेनुसार या बिलाची रक्कम 7 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे त्या मुलीला ब्रेकअप करण्याची खूप शिक्षा मिळाली आहे.
तुम्हाला हे प्रकरण गमतीशीर वाटत असले तरी हा प्रकार चीनमध्ये घडला आहे. प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर केलेला सगळा खर्च एका कागदावर लिहून ठेवला आहे. ब्रेकअप झाल्यानंतर त्याने हा खर्च तिच्या हातावर ठेवत तिला सगळी रक्कम परत मागितली आहे. त्यामुळे त्या मुलीला ब्रेकअप केल्याचा पश्चाताप होत असेल.
अगदी क्षुल्लक वस्तूंचा खर्च ही त्याने यादीत लिहिला आहे. यामध्ये चिप्स, पाण्याची बॉटल, दोघांनी सोबत केलेल्या जेवणाचा निम्मा निम्मा खर्च आणि तिच्या आईच्या निधनानंतर केलेला खर्च अशी भलीमोठी यादी त्याने केली आहे. वेळ कोणतीही असो काहींना त्याच्या स्मरणशक्तीचे कौतुक करावेसे वाटत आहे तर काहींना त्याचा राग ही येत आहे.
चीन या देशामध्ये डेटिंगचे स्वरूप हे पारंपारिक आहे. यामध्ये प्रियकर आणि प्रेयसीनंतर लग्न करतात. त्यामुळे ब्रेकअप फीकडे पिडीत व्यक्तीचे भावनिक नुकसान म्हणून पहिले जाते. या रकमेमुळे पिडीत व्यक्तीला त्याचे आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सुरु करता येते. माध्यमांमध्ये यासंबधी बऱ्याच बातम्या येतात.
यांसारख्या बऱ्याच घटना घडल्या असल्या तरी त्याकडे एक विनोदाचा भाग म्हणून पहिले जाते. चीनमध्ये प्रियकर किंवा प्रेयसीकडून ब्रेकअप फीस घेतल्याच्या घटना काही नवीन नाहीत. यापूर्वीही या देशात प्रियकर किंवा प्रेयसीकडून ब्रेकअप फी घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.