Share

काय सांगता? ‘तू तेव्हा तशी’मध्ये कपलची भूमिका साकारणारे शिल्पा आणि स्वप्निल ‘या’ मालिकेत होते मायलेक

Tu Tevha Tashi

झी मराठी वाहिनीवर नुकतीच काही दिवसांपूर्वी ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) ही नवी मालिका सुरु झाली. तर या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिका साकारत आहेत. तर या मालिकेत प्रेमीयुगल म्हणून दिसणारे शिल्पा आणि स्वप्निल यापूर्वी एका मालिकेत चक्क मायलेक म्हणून काम केले होते. वाचून आश्चर्य वाटलं असेल ना. तर जाणून घेऊया याबद्दल.

शिल्पा तुळसकर आणि स्वप्निल जोशीने १९९९ मध्ये आलेल्या ‘हद कर दी’ या विनोदी हिंदी मालिकेत एकत्र दिसले होते. या मालिकेत स्वप्निलने शिल्पाच्या मुलाची भूमिका साकारली होती. मराठी सीरिअल्स ऑफिशियल नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच ‘हद कर दी’ मालिकेतील शिल्पा आणि स्वप्निलचा एक सीनही यामध्ये पोस्ट करण्यात आला आहे.

ही पोस्ट समोर येताच अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच या पोस्टवर कमेंट करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने या पोस्टवर कमेंट करताना लिहिले की, ‘खरंच शिल्पा आणि स्वप्निलची जोडी शोभत नाही. ती स्पनिलची हिरोईन असे अजिबात वाटत नाही’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘बरोबर आहे. ही जोडी आई-मुलाची म्हणूनच शोभते’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हद कर दी’.

दरम्यान, तू तेव्हा तशी ही मालिका सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. मालिकेत अत्यंत साधा, कमी बोलणारा अभिनेता आणि दुसरीकडे एक हजरजबाबी, बिनधास्त अभिनेत्री अशा दोन व्यक्तींची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तर स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. मालिका सुरु झाल्यानंतर काहींना ही फ्रेश जोडी आवडली. तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली.

अनेकांनी या मालिकेत कलाकारांची निवड चुकली म्हणत मालिकेला ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला. स्वप्निल जोशीसोबत मुक्ता बर्वेच हवी होती, असे अनेकांनी म्हटले. पण आता या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसून येत आहे. नुकतीच मालिकेच्या आठवड्याच्या टीआरपीमध्ये या मालिकेला टॉप १० मध्ये जागा मिळाली आहे.

दरम्यान, स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकरशिवाय या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले आणि सुहास जोशी या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती
लोकांना वाटले होते की माझं करिअर इथेच संपलं पण.., kaun pravin tambe च्या यशानंतर श्रेयसचा खुलासा
रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now