महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाई परिचित आहेत. महिलांना काही धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशासाठी बंदी असताना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन उभे करणाऱ्या तृप्तीताई तुम्हाला माहितीच असतील. याचबरोबर नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनांवरुन चर्चेत असणाऱ्या देसाई यांच्या नावाची चर्चा आता मात्र वेगळ्या कारणासाठी झाली आहे.
राज्य सरकारकडून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन उपक्रम राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. पण ही योजना चर्चेत आल्याचं कारण म्हणजे या कीटमध्ये एक रबरी लिंग देण्यात आलं आहे.
मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर्स नाराज असून त्यांच्या समोर अजब पेच निर्माण झाला आहे. आशा सेविकांना ते रबरी लिंग घेऊन गावागावात फिरायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. याचाच धागा पकडत अनेकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नसल्याचे मत देसाई यांनी मांडले आहे. त्या याबाबत माध्यमांशी बोलत होत्या.
पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असं म्हणत देसाई यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
तसेच आम्ही हे कसे दाखवू, ग्रामीण भागातील महिला काय म्हणतील, असा जर आपण संकुचित विचार आता एकविसाव्या शतकात करत बसलो तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. तसेच राज्य सरकारने आपल्या कीटमध्ये रबरी लिंग देऊन कोणतीही चूक केलेली नाहीये, असेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
शिवजयंतीच्या वादात मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढली एकमेकांची अक्कल; काय घडलं नक्की..
‘गली बॉय’ फेम रॅपर धर्मेश परमारचं दुःखद निधन; वयाच्या 24 व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास
मरण आलं पण न्याय नाही मिळाला; लेकीसाठी झगडणाऱ्या बापाचा दुर्दैवी अंत, शेवटपर्यंत प्रशासनाने केलं दुर्लक्ष
तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत वाद, मुनगंटीवार आणि अजितदादा भिडले