Share

तृप्ती देसाई भडकल्या; ‘परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु…’

trupti desai

सोशल मीडियावर सध्या एका कीर्तनकाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कीर्तनकार हे औरंगाबादचे असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी कीर्तनकारांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे.

असे असतानाच आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या, भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा  तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आपण कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका प्रतिष्ठित कीर्तनकाराचे महिला कीर्तनकारासोबत संभोग करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले असून ते मला प्राप्त झाले असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल असे या कीर्तनकाराचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला आहे. यावरून तृप्ती देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

तृप्ती देसाई यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे संबंधित व्हिडिओ क्लिपसह निवेदन पाठवले आहे. सदर कीर्तनकारावर सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A  आणि IPC 292 अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी गृहमंत्र्यांकडे केली.

तसेच याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘सदर कीर्तनकाराने एका महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला असून त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिलांची प्रतिष्ठा पायदळी तुडवणारी असल्याने या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी.’

‘परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु तो हेतु परस्पर चव्हाट्यावर मांडणे ही मनोविकृती म्हणावी लागेल, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. वाचा कीर्नकारांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं खरं कारण.. सदर कीर्तनकार महाराजांचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. युट्युबवर सुद्धा लाखो लोक त्यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ पाहतात.

त्यामुळे त्यांचे कीर्तन आपल्या गावात ठेवण्यासाठी काही ग्रामस्थ आग्रही होते. त्यामुळे त्या महाराजांचे कीर्तन ठेवण्यासाठी काही नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी ग्रामस्थांनी गावात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा असल्याचे सांगितले. तसेच तुमचे कीर्तनाचे काही व्हिडिओ असतील ते पाठवा असे महाराजांना सांगितले. त्यावेळी कीर्तनाच्या व्हिडिओसोबत महाराजांकडून तो आक्षेपार्ह व्हिडिओ देखील चुकून पाठवला गेला आणि तो व्हिडिओ सगळीकडेच व्हायरल झाला.

महत्त्वाच्या बातम्या
ईशान किशनला लिलावात १५.२५ कोटी मिळाल्यानंतर वडिलांचा वाढला होता बीपी, स्वतः इशानने सांगितला भन्नाट किस्सा
करण जोहर माझ्या मिशांवर झाला होता घायाळ, ट्विंकल खन्नाचा विचित्र खुलासा
‘रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का?’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
हा गावचा सरपंच आहे की देशाचा पंतप्रधान हेच समजत नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now