Share

‘महाराष्ट्राला “मद्यराष्ट्र” करण्याकडे वाटचाल, हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे’

trupti desai

आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे. (trupti desai criticize udhav thcakeray )

दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.

राज्य सरकारच्या या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईने कडाडून विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, ‘या सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आणि आता सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार. यांना तरुणांचे भविष्य घडवायचे आहे की अंधारात ठेवायचे? असा संतप्त सवाल देसाई यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक तरूण गैरमार्गाला लागले आहेत ,गुन्हे वाढत आहेत त्यात असा निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे, हे एकदा महाविकास आघाडी सरकारने सांगावे, असे म्हणत देसाई यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर आता भाजप नेते अधिक आक्रमक झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही तर महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिला आहे.

‘शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी, असे फडणवीस म्हणाले.

तसेच पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.

महत्त्वाच्या बातम्या
फडणवीसांची शिष्टाई अपयशी! उत्पल पर्रिकरांचा पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल
प्रजासत्ताक दिनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली अनाथ मुलांना भेट, दिलेली भेटवस्तु पाहून कौतूक वाटेल
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही; विरोधक आक्रमक
खऱ्या आयुष्यातील बजरंगी भाईजान, आतापर्यंत ६०० हून जास्त बेपत्ता मुलांना पोहोचवलंय घरी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now