Share

“या राजकीय नेत्यांना लोक चपलांनी मारतील”, तृप्ती देसाईंचा श्रीकांत देशमुखांवर निशाणा

भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख(Shrikant Deshmukh) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रडत-रडत श्रीकांत देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(trupti desai criticize shrikant deshmukh)

या व्हिडिओवरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी श्रीकांत देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अशी कृत्ये केली तर या राजकीय नेत्यांना काही दिवसांनी लोक चपलांनी मारतील, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी श्रीकांत देशमुख यांच्यावर टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या की, “आज सोलापूरमध्ये के व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा हा व्हिडिओ आहे. हाच श्रीकांत देशमुख मुंबईत जातो. मला हनी ट्रॅपमध्ये अडकवले जाणार आहे, असे सांगतो. अरे हनी ट्रॅपमध्ये कोण अडकतो.”

“जे अनैतिक संबंध ठेवतात. त्यांना हनी ट्रॅपची भीती असते. मागच्या वेळी कीर्तनकारांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता राजकीय नेत्यांचा होऊ लागला आहे. अरे सामान्य जनतेच्या नजरेत तुम्ही चांगले समजले जातात. अशी कृत्ये केली तर काही दिवसांनी लोक तुम्हाला चपलांनी मारतील”, असे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यामुळे श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी श्रीकांत देशमुख यांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती मिळत आहे. सध्या या व्हिडिओची सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, “सोलापूरच्या या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. या राजकारण्यांना आपण किती सन्मान दिला पाहिजे. त्यानंतर तो जर चुकतोय त्याच्या विरोधात आपण आवाज उठवायला हवा. तरच आपल्या घरातील मुली त्याच्या हातून वाचतील”, असे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
लसिथ मलिंगाने आपल्या मुलाला दिलंय हटके नाव, तुम्हीही देऊ शकतात तुमच्या मुलाला ‘हे’ श्रीलंकन नाव
चंद्रभागेत बुडणाऱ्या दोन भावांसाठी जणू विठ्ठलाने पाठवली मदत, रेस्क्यू टीमने ‘अशा’ प्रकारे वाचवले प्राण
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेने आखला मास्टर प्लॅन; थेट राज्यपालांना पत्र

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now