काल चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने उड्डाण केले. यामुळे सर्वांनी एकच जल्लोष केला. हे चांद्रयान-3 पुढील महिन्यात 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या संपूर्ण टीमने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
या टीममध्ये रांची येथील शास्त्रज्ञ सोहन यादव यांचाही समावेश आहे. सोहन यांचे वडील घुरा यादव हे ट्रक चालक आहेत. तापकारासारख्या छोट्या गावात शिक्षण घेऊन सोहन शास्त्रज्ञ झाले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण तापकरा येथील शिशु मंदिरात झाले.
गेल्या सात वर्षांपासून ते इथे काम करत आहेत. इस्रोमध्ये काम करणाऱ्या सोहन यांचा ऑर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीममध्ये समावेश आहे. मिशन गगनयानच्या चमूमध्ये देखील त्यांचा समावेश होता.
यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली आहे. १५ दिवसांपूर्वी त्याची आई देवकी देवी आणि भाऊ गगन यादव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. तेव्हा ते या चांद्रयान-३ मोहिमेविषयी खूप उत्सुक होते अशी माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली आहे.
दरम्यान, आता आपण चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतरच १५ दिवसांनी बोलू शकू, असे सोहन यांनी आपल्या आईला फोनवर सांगितले होते. यामुळे त्यांचा कुटूंबाचे देखील याकडे लक्ष लागले होते.
सुमारे 45 ते 50 दिवस प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. आता यामधून अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.