Share

तृप्ती देसाईंना एकनाथ शिंदेंचा निर्णय अमान्य; म्हणाल्या, गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याऐवजी…

गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे अनेक सण उत्सवाप्रमाणे दहीहंडीचा उत्सव देखील साजरा केला जात नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने सर्वच सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे.

काल महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. या दहीहंडी प्रेमींसाठी शासनाने महत्वाच्या घोषणा केल्या. शासनाने यंदा गोविंदांना भरघोस सूट, योजना यांचा लाभ दिलेला आहे. मात्र, यावरून आता शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभही मिळणार आहे. त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सरकारला टोला लगावला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, अशी मागणी केली.

तृप्ती देसाई म्हणाल्या, वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा शिंदे सरकारने दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, आशीर्वाद तरी मिळतील.

गोविंदांना आता खेळाडूंचा दर्जा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. इतर खेळांमधल्या खेळाडूंना ज्या सुविधा मिळतात, त्या आता गोविंदांनाही मिळणार आहे. शिवाय राज्य सरकारच्या खेळाडूंसाठीच्या नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभही घेता येणार आहे. या घोषणेमुळे विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

दरम्यान, स्पेन, चीनसारख्या देशांत पिरॅमिड म्हणून या प्रकाराचा खेळात समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही दहीहंडीसाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत आहे. दहीहंडी हा सण-उत्सव असला तरी त्यातील साहस आणि क्रीडा कौशल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं होतं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now