औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण रक्तबंबाळ स्थितीत दिसत आहे. तो लोकांना मदत मागत आहे, मात्र लोक फक्त बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ काढण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहेत.
रक्तबंबाळ तरुण रस्त्यावर पडून आहे. तो विव्हळत असल्याचं दिसतंय. आजूबाजूला लोकं जमली आहे. तरुणाला तडफडताना ही सगळी माणसं बघत आहेत. पण एकही जण मदतीसाठी पुढे आल्याचं दिसत नाही. बघ्यांच्या गर्दीतमध्ये व्हिडीओ काढणाऱ्यांचे मोबाईलच तेवढे बाहेर आल्याचं दिसतं. हे एकूणच थरकाप उडवणारं दृश्य आहे.
घडलेली घटना सविस्तर म्हणजे, एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. इतकी की हा तरुण जागेवरुन उठणं तर दूरच पण रक्तबंबाळ झाला होता. त्याच्या डोक्यापासून पाठीपर्यंत रक्तच रक्त दिसत होतं. या तरुणाला उठताही येत नव्हतं. अर्धबेशुद्ध अवस्थेत हा तरुण तडफडत आणि विव्हळत होता.
जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला पाहून त्या ठिकाणी लोकांची एकच गर्दी जमू लागली. काय झालंय? हे पाहण्यासाठी लोकं एकवटली. मोबाईलमधून लोकं रक्तबंबाळ तरुणाचे व्हिडीओ रेकॉर्ड करु लागले. काय झालं? काय झालं? यावरुन कुजबूज सुरु झाली. पण रक्तबंबाळ तरुणाच्या मदतीसाठी एकही जण पुढे आला नाही.
सोशल मीडियावर सध्या हा थरकाप उडविणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्यक्तिगत वादातून या तरुणाला मारहाण झाली असावी, अशी शंका घेतली जातेय. पण या तरुणाला मारहाण कुणी केली? कशी केली? यावरुन चर्चांना उधाण आलंय. नुकतीच औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती.
एका तरुणाला मारहाण केली जात होती. तो दया मागत होता, माफी मागत होता, पण मारहाण करणारे हैवानासारखे त्याला बांबूचे फटके देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना औरंगाबादच्या टीव्ही सेंटर परिसरातली होती. जीव जाईपर्यंत या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. त्याचा जीव गेल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता औरंगाबाद प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.