यंदाच्या आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. यष्टिरक्षक इशान किशनला विक्रमी बोली लागली, दीपक चाहर आणि श्रेयस अय्यरलाही मोठी रक्कम मिळाली. हर्षल पटेल, वनेंदू हसरंगा यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला आहे. (top expensive player in ipl)
गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट हे वरचढ दिसत होते. ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर, मिचेल मार्श यांनाही अष्टपैलू खेळाडूंमध्ये मोठी किंमत मिळाली. लखनऊ सुपरजायंट या नव्या संघाने क्विंटन डी कॉक, कृणाल पांड्या, दीपक हुडा या खेळाडूंना आपलेसे केले.
बेंगलोरनेही लिलावात अनेक मोठी नावे जोडली. फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिकसारखे खेळाडू या संघाशी जोडले गेले आहेत. नेहमीप्रमाणे अष्टपैलू खेळाडूंना लिलावात जास्त पैसे मिळत आहेत. मात्र, गोलंदाजांच्या किंमतही उंचावल्या आहेत. आयपीएल २०२२ च्या लिलावात हैराण करणारी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पूर्वीइतके पैसे मिळाले नाहीत.
जाणून घेऊया कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले-
१. इशान किशन – १५.२५ कोटी, मुंबई इंडियन्स
२. दीपच चाहर – १४ कोटी चेन्नई सुपर किंग्स
३. श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
४. शिखर धवन – ८.२५ कोटी, पंजाब किंग्स
५. आर अश्विन – 5 कोटी, राजस्थान रॉयल्स
६. पॅट कमिन्स – ७.२५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स
७. कागिसो रबाडा – ९.२५ कोटी, पंजाब किंग्स
८. ट्रेंट बोल्ट – ८ कोटी रुपये, राजस्थान रॉयल्स
९. फाफ डू प्लेसिस – ७ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१०. मोहम्मद शमी – ६.२५ कोटी, गुजरात टायटन्स
११. क्विंटन डी कॉक – ६.७५ कोटी, लखनौ सुपरजायंट्स
१२. डेव्हिड वॉर्नर – ६.२५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
१३. मनीष पांडे – ४.६९ कोटी, लखनऊ सुपर जायंट्स
१४. शिमरॉन हेटमायर – ८.५० कोटी, राजस्थान रॉयल्स
१५. रॉबिन उथप्पा- २ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
१६. जेसन रॉय – २ कोटी, गुजरात टायटन्स
१६. देवदत्त पडिक्कल – ७.७५ कोटी, राजस्थान रॉयल्स
१६. ड्वेन ब्राव्हो – ४.४ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
१७. नितीश राणा – ८ कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
१८. जेसन होल्डर – ८.७५ कोटी, लखनऊ सुपरजायंट्स
१९. वानिंदू हसरंगा- १०.७५ कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०. हर्षल पटेल – १०.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२१. दीपक हुडा – ५.७५ कोटी, लखनऊ सुपरजायंट्स,
२२. वॉशिंग्टन सुंदर – ८.२५ कोटी, सनरायझर्स हैदराबाद
२३. कृणाल पांड्या – ८.२५ कोटी, लखनौ सुपरजायंट्स.
२४. मिचेल मार्श – ६.५० कोटी, दिल्ली कॅपिटल्स
२५. अंबाती रायडू – ६.७५ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
२६. जॉनी बेअरस्टो – ६.७५ कोटी, पंजाब किंग्स
२७. निकोलस पूरन, १०.७५ कोटी, सनरायझर्स हैदराबाद
२८. दिनेश कार्तिक- ५.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२९. टी नटराजन- ४ कोटी, सनरायझर्स हैदराबाद
३०. दीपक चहर- १४ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
३१. प्रसिद्ध कृष्णा – १० कोटी, राजस्थान रॉयल्स
३२. लोकी फर्ग्युसन- १० कोटी, गुजरात टायटन्स
३३. जोश हेझलवुड- ७.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
३४. मार्क वुड- ७.५ कोटी, लखनऊ सुपरजायंट्स
३५. भुवनेश्वर कुमार- ४.२ कोटी, सनरायझर्स हैदराबाद
३६. मुस्तिफिझूर रहमान- २ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
३७. शार्दुल ठाकूर- १०.७५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
३८. कुलदीप यादव- २ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
३९. राहुल चहर- ५.२५ कोटी, पंजाब किंग्स
४०. युझवेंद्र चहल – ६.५ कोटी रुपये, राजस्थान रॉयल्स
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या दिवशीच खासदाराने १८ वर्षीय मुलीशी केले तिसरे लग्न, लग्नाचा फोटोही केला पोस्ट
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
इशान किशन ठरला लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील